हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात क्षयरोगमुक्त भारत अभियान
बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन विभाग व मध्यवर्ती कारागृहाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कैद्यांना मार्गदर्शन करण्यात आले. कारागृहाचे अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती, क्षयरोग संशोधन केंद्राचे संचालक डॉ. उमाशंकर, जिल्हा क्षयरोग निर्मूलन अधिकारी डॉ. चांदनी देवडी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एन. तुक्कार आदी यावेळी उपस्थित होते. जेलर राजेश धर्मट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एस. शालदार, आरोग्य विभागाचे व्ही. आर. पाटील, एस. एस. हंपण्णावर, स्मिता एम. एम., संजना हेरेकर, जेलर एफ. टी. दंडयन्नावर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. उमाशंकर म्हणाले, 2025 च्या अखेरपर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र जागृती कार्यक्रम करण्यात येत आहेत. यावेळी सर्व कैद्यांची तपासणी करण्यात आली. शशिकांत यादगुडे यांनी स्वागत केले. मारुती खामकर यांनी क्षयरोगमुक्त भारताची शपथ देवविली.