महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शेअर बाजारात गुरुवारी तेजीची सुनामी

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्सची 1197 अंकांवर उसळी : निफ्टीचा प्रवासही 23 हजाराच्या जवळपास

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

Advertisement

आर्थिक कंपन्यांच्या समभागांमधील तेजी आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्याकडून सरकारला विक्रमी लाभांश दिला आहे. यावेळी बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर गुरुवारी 1197 अंकांचा विक्रमी टप्पा प्राप्त करत तेजीची त्सुनामी आली होती. दुसऱ्या बाजूला निफ्टीनेही मजबूत कामगिरी केली आहे. सेन्सेक्स व निफ्टीमधील मजबुतीमुळे गुंतवणूकदारांना जवळपास 6 लाख कोटींचा फायदा झाला आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 1196.98 अंकांच्या भक्कम तेजी सोबत निर्देशांक 1.61 टक्क्यांसोबत 75,418.04 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा अंतिम क्षणी 369.95 अंकांच्या तेजीसह निर्देशांक 1.64 टक्क्यांसह 22,967.65 वर बंद झाला आहे. भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग सहाव्या सत्रात तेजी राहिली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीच्या कालावधीनंतर आता असा प्रवास झाला आहे.

वाहन बँक समभागांची झेप

सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये गुरुवारच्या सत्रात लार्सन अॅण्ड टुब्रो यांचे समभाग हे तब्बल 3.64 टक्क्यांनी तेजी प्राप्त करत ते 3586.15 वर बंद झाले आहेत. यासोबतच महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय  बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, स्टेट बँक, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा यांचे समभाग हे वधारले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सनफार्मा, पॉवरग्रिड कॉर्प, हिंडाल्को, कोल इंडिया, एनटीपीसी आणि टाटा कंझ्युमर यांचे समभाग प्रभावीत राहिले आहेत. जगातील मुख्य घडामोडींमध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष जेरोम पावेल यांनी महागाईशी संबंधीत संकेतामुळे बाजाराला बळ मिळाले आहे. दुसरीकडे भारतीय केंद्रीय रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला आर्थिक वर्ष 2023-24 मधील 2.11 लाख कोटी रुपये इतका विक्रमी लांभाश दिला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना बळ मिळाले असल्याने बाजाराने चमकदार कामगिरी केली आहे.

अन्य बाजारांची स्थिती

आशियातील बाजारात जपानचा निक्की हा वधारुन बंद झाला. तर दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय व हाँगकाँगचा निर्देशांक प्रभावीत झाला आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 समभाग घसरलेल्या कंपन्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article