महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न! घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, टोप येथील घटना

10:23 AM Jun 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

पुलाची शिरोली /वार्ताहर

टोप ता. हातकणंगले येथे रविवारी रात्री उशिरा स्नॅक्स पॉईंट खोके पट्रोल टाकून पेटवण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न झाला आहे. हि घटना रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

Advertisement

टोप येथील नारायण बोंगार्डे यांचे पूणे- बंगलूर राष्ट्रीय महामार्गालगत टोप -कासारवाडी फाट्यावर रायबा चहा व समर्थ स्नॅक्स पॉईंटचे दुकान आहे. रविवारी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून पेट्रोल टाकून ते दुकान पेटवण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान हि घटना बिरदेव मंदीरा शेजारी असलेल्या तरुणांना निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ हि आग विझवल्यामुळे नुकसान टळले. पण या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

काही दिवसापूर्वी याच दुकानामध्ये चोरीचा प्रकार झाला होता. त्यावेळी २५ हजारांचे साहित्य चोरीस गेले होते. त्यामुळे हि घटना व्यावसायिक स्पर्धा अथवा कोणत्या तरी रागातून घडली असावी. अशी चर्चा सध्या गावात सुरु आहे.

अशी घटना वारंवार घडू नये म्हणून बोंगार्डे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये रविवारच्या घटनेतील अज्ञात व्यक्तीचे शुटींग कैद झाले आहे. घटनास्थळी शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली. या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे.

Advertisement
Tags :
CCTV incident TopeIncident caught on CCTVkolhapur newspetrol
Next Article