हिवाळ्यात ट्राय करा गरमागरम आणि हेल्दी ब्रोकोली सूप
थंडीच्या दिवसांत ‘ब्रोकोली’ बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. डायट प्रेमी लोकांच्या आहारात तर ब्रोकोली जास्त प्रमाणात आढळते. यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. याव्यतिरिक्त, त्यात बरीच जीवनसत्त्वे देखील आढळतात. ब्रोकोलीमध्ये लोह, व्हिटामिन ए, सी, पोटॅशियम, प्रथिने, कॅल्शियम, कर्बोदके आणि क्रोमियम असतात, जे कर्करोगापासून आपला बचाव करतात. पण बऱ्याच वेळेला ही ब्रोकोली खायची कशी हा प्रश्न पडतो. पण यासाठी
ब्रोकोली सूप एक बेस्ट ऑप्शन आहे. शरीरातील प्रतिकारकक्षमता वाढवण्यासाठीही ब्रोकोली सूप फायद्याचे ठरते. चला तर मग जाणून घेऊया ब्रोकोली सूप कसं बनवायचं.
ब्रोकोली सूप तयार करण्यासाठी लागणारे साहित्य-
१२५ ग्रॅम ब्रोकोली
अर्धा चमचा मीरे पावडर
अर्धा चमचा जीरे पावडर
१ चमचा कॅार्नफ्लोअर
१ चमचा कणिक
बारीक चिरलेला कांदा
१ चमचा फ्रेश क्रिम किंवा दुधाची साय
चवी प्रमाणे मीठ
कृती-
पहिल्यांदा ब्रोकोलीचे लहान तुकडे करून ते स्वच्छ धुवून घ्या.यानंतर एका भांड्यात दोन कप पाणी आणि थोडे मीठ टाकून ते गरम करायला सोडा. नंतर त्यात तुकडे केलेले ब्रोकोली टाका. ३० सेकंदानंतर ब्रोकोली पाण्याच्या बाहेर काढा. आता गॅसवर एक भाडे ठेवा. बारीक कापलेला कांदा आणि लसीन त्याबरोबर मध टाका. कांद्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्या.नंतर त्यात मैदा आणि पाणी टाका आणि दोन मिनीट लहान गॅस ठेवा. नंतर मऊ पडलेली ब्रोकोली यात टाका. नंतर १० मिनीटे हे मिश्रण शिजवा.त्यानंतर सूपचे हे मिश्रण आणि गरम दूध एकत्र करून एकजीव करून घ्या. नंतर ते मिश्रण लहान गॅस सोडून गरम करा. त्यानंतर त्या सूपमध्ये मिक्स हर्ब टाका. जेंव्हा सूप गरम होईल तेंव्हा यात मीठ, मिरपूड आणि जायफळ पावडर टाका.
त्यानंतर तुमचे ब्रोकोली सूप तयार होईल. हिवाळ्यात गरमागरम ब्रोकोली सूप सर्व्ह करा.