For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केस गळत आहेत; मग आवळा खा !

01:02 PM Nov 26, 2024 IST | Pooja Marathe
केस गळत आहेत  मग आवळा खा
Hair is falling out; then eat amla!
Advertisement

कोल्हापूरः
सध्या थंडीचा सिझन आल्यामुळे बाजारात आवळे दिसायला सुरुवात झाली आहे. साधारण तुळशीच्या लग्नानंतर आवळे यायला सुरुवात होते. आवळा हा चवीला तुरट आणि आंबट असला तरी अत्यंत गुणकारी आहे.

Advertisement

थंडीच्या दिवसात सर्वसाधारणपणे केस गळतीचे प्रमाण वाढते. जसे झाडाची थंडीमध्ये पानगळती असते त्याप्रकारे आपलेही केस या सिझनमध्ये गळतात. यावर अत्यंत उपायकारी म्हणजे आवळा आहे. आवळ्याचे तेल लावल्याने केस गळती कमी होते आणि केस दाट, चमकदार होतात.

आवळ्याला भारतीय गूसबेरी असेही म्हणतात. आवळ्याचे केसांच्या उत्तम आरोग्यासाठी अनेक उपयोग आहेत. आवळ्यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे रक्त परिसंचरण सुधारतात आणि केसांच्या वाढीला मदत करतात. आवळ्यातील व्हिटॅमिन सी केसांमध्ये कोलेजनची पातळी वाढवते. आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे केसांच्या कूपांना पोषण देतात आणि मजबूत करतात, त्यामुळे केस गळणे थांबते.
आवळ्याच्या अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आहे. जो कोंड्यावर नित्रंयण करतो. आवळा नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो.

Advertisement

आवळ्याचे इतरही फायदे

तसेच थंडीच्या दिवसात आपली त्वचा सुद्घा कोरडी होते. आवळ्याचा रस किंवा चूर्ण नियमित घेतल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो व त्वचा तजेलदार दिसते.

आवळा हा 'व्हिटॅमिन सी' ने परिपूर्ण आहे. त्यामुळे आवळ्याच्या सेवनाने सर्दी, खोकला व हिवळ्यातील इतर आजारांपासून संरक्षण मिळते. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.

आवळ्याचे चूर्ण, लोणचं किंवा रस घेतल्याने पचनक्रिया सुधारते. अजीर्णची समस्या कमी होते.

हिवाळ्यात शरिरात समतोल सांभाळण्यासाठी आवळ्याचे सेवन उपयुक्त ठरते. आवळा शरीराला उष्णता देतो.

दिवसभर फ्रेश राहण्यास मदत करतो. आवळ्याचा मुरंबा किंवा गुळसर सरबत प्यायल्याने शरीराला उष्णता मिळते.

आवळ्याच्या लोणच्याचा आहारात समावेश करा.

आवळ्याचा रस मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

Advertisement

.