महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी प्रयत्न करा

11:59 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विमानतळ सल्लागार समितीची खासदार शेट्टर यांच्याकडे मागणी

Advertisement

बेळगाव : बेळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डींगच्या बांधकामाबाबत चर्चा करण्यासोबतच बेळगाव विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विमानतळ सल्लागार समितीने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली. शनिवारी विमानतळ सल्लागार समितीची अखेरची बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार मंगला अंगडी, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. खासदार जगदीश शेट्टर यांनी नव्या टर्मिनल बिल्डींगच्या बांधकामाची माहिती घेतली. विमानतळावरील समस्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पुढील वर्षासाठी आता नवीन सल्लागार समितीची स्थापना केली जाणार आहे. यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक यांना स्थान देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. यासह विविध विषयांवर अधिकारी तसेच विमानतळ कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. विमानतळाचे संचालक त्यागराजन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी सल्लागार समितीचे सदस्य अनुप काटे, प्रियांका आजरेकर, ज्योती शेट्टी, गुरुदेव पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article