For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुन्या सहकाऱ्यांवर विश्वास, नव्या सहकाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी

06:21 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
जुन्या सहकाऱ्यांवर विश्वास  नव्या सहकाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

नरेंद्र मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचे  खातेवाटप सोमवारी जाहीर करण्यात आले. यंदाच्या मंत्रिमंडळात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा समावेश असून त्यांना अपेक्षेनुसार कृषी तसेच ग्रामविकास मंत्रालयांची जबाबदारी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून झालेली निदर्शने पाहता शिवराजसिंह चौहान यांच्या कामगिरीवर सर्वांची नजर लागून राहणार आहे. तर निजदचे खासदार एच.डी. कुमारस्वामी हे अवजड उद्योग अन् इस्पात मंत्री असतील. अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले गेलेल्या नितीन गडकरी यांच्याकडे पूर्वीच्याच रस्ते परिवहन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. राजनाथ सिंह हेच संरक्षणमंत्री तर अमित शाह हे गृहमंत्री आणि निर्मला सीतारामन या अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. तर दुसरीकडे तेलगू देसम पक्षाचे खासदार राममोहन नायडू यांना नागरी उ•ाण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांकडे जबाबदारी

Advertisement

नितीन गडकरी यांच्यासोबत रस्ते परिवहन मंत्रालयासाठी दोन राज्यमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत. उत्तराखंडमधील खासदार अजय टम्टा तसेच दिल्लीतील खासदार हर्ष मल्होत्रा हे रस्ते परिवहन राज्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना नागरी उ•ाण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर रावेरच्या खासदार रक्षा खडसे या युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांना आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

कर्नाटकातील नेत्यांवर दाखविला विश्वास

निजदचे खासदार एच. डी. कुमारस्वामी हे केंद्रीय अवजड उद्योग आणि इस्पात मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. तर भाजप नेते प्रल्हाद जोशी यांना ग्राहक व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शोभा करंदलाजे यांच्याकडे लघु आणि मध्यम उद्योगासह कामगार आणि रोजगार राज्यमंत्री असतील. व्ही सोमण्णा हे जलशक्ती आणि रेल्वे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळतील.

श्रीपाद नाईकांकडे महत्त्वाची जबाबदारी

गोव्यातील भाजप खासदार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते श्रीपाद नाईक हे ऊर्जा आणि नुतनीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. श्रीपाद नाईक यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रिमंडळात गोव्याला प्रतिनिधित्व मिळाले आहे.

खट्टरांकडे महत्त्वाचे खाते

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच शहरविकास मंत्रालयाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना या विभागांचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

शिवराजसिंह ठरले महत्त्वाचे चेहरे

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कृषी तसेच शेतकरी कल्याण आणि पंचायत तसेच ग्रामविकास मंत्रालयाची धुरा देण्यात आली आहे. शिवराजसिंह यांनी मध्यप्रदेशात घडवून आणलेल्या कृषी सुधारणा पाहता त्यांना हे पद देण्यात आले आहे. शेतकरी संघटनांसोबत जुळवून घेत देशाच्या कृषीक्षेत्राची भरारी घडवून आणण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलावे लागणार आहे.

निर्मला सीतारामन पुन्हा अर्थमंत्री

मागील सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेल्या निर्मला सीतारामन यांच्यावरच अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याचबरोबर हिंदुस्थान अवाम मोर्चाचे एकमेव खासदार आणि मोदी सरकारमधील सर्वात वरिष्ठ सदस्य (79 वर्षे) जीतनराम मांझी हे लघु-मध्यम उद्योग मंत्री असणार आहेत. त्यांच्या या विभागात शोभा करंदलाजे राज्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

सी.आर. पाटील जलशक्ती मंत्री

गुजरात भाजपचे अध्यक्ष आणि नवसारीचे खासदार चंद्रकांत पाटील यांना जलशक्ती मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू सहकारी मानले जातात. तर निजदचे नेते कुमारस्वामी हे अवजड उद्योग अन् इस्पात मंत्री असणार आहेत.

कॅबिनेट मंत्री...

राजनाथ सिंह                   संरक्षणमंत्री

अमित शाह              गृह आणि सहकार

नितीन गडकरी                रस्ते परिवहन

जगतप्रकाश न•ा                  आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायन, खत

शिवराजसिंह चौहान               कृषी, शेतकरी कल्याण, ग्रामविकास

निर्मला सीतारामन                 अर्थ

डॉ. एस. जयशंकर                   विदेश व्यवहार

अश्विनी वैष्णव               रेल्वे, माहिती-प्रसारण

सर्वानंद सोनोवाल                   जहाजबांधणी

धर्मेंद्र प्रधान             शिक्षण

हरदीपसिंह पुरी                पेट्रोलियम, नैसर्गिक वायू

मनोहरलाल खट्टर                ऊर्जा, शहरविकास

गिरिराज सिंह                  वस्त्राsद्योग

एच. डी. कुमारस्वामी            अवजड उद्योग, इस्पात

प्रल्हाद जोशी          ग्राहक व्यवहार

पियूष गोयल           वाणिज्य आणि उद्योग

जीतनराम मांझी            लघु आणि मध्यम उद्योग

ललन सिंह                पंचायतराज, मत्स्यपालन, पशुपालन अन् डेअरी

डॉ. विरेंद्र कुमार               सामाजिक न्याय आणि अधिकार

किंजरापू राममोहन नायडू  नागरी उ•ाण

जुएल ओराम           आदिवासी विकास

ज्योतिरादित्य सिंधिया                  दूरसंचार अन् ईशान्य विकास

भूपेंद्र यादव              पर्यावरण

अन्नपुर्णा देवी                 महिला आणि बालविकास

गजेंद्रसिंह शेखावत                  संस्कृती आणि पर्यटन

किरेन रिजिजू                  संसदीय कामकाज, अल्पसंख्याक

मनसुख मांडविया          युवा कार्य आणि क्रीडा, श्रम आणि रोजगार

जी. किशन रे•ाr            कोळसा आणि खाण

चिराग पासवान               अन्नप्रक्रिया, क्रीडा

चंद्रकांत पाटील               जलशक्ती

राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)

राव इंद्रजीत सिंह            सांख्यिकी, कार्यक्रम अंमलबजावणी, नियोजन, संस्कृती राज्यंमत्री

जितेंद्र सिंह               विज्ञान-तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान,  कार्मिक, लोकतक्रारी आणि पेन्शन, अणुऊर्जा, अंतराळ अन् पीएमओ राज्यमंत्री

अर्जुन राम मेघवाल                कायदा आणि न्याय, संसदीय कामकाज राज्यमंत्री

प्रतापराव जाधव             आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री

जयंत चौधरी           कौशल्य विकास, उद्योजकता, शिक्षण राज्यमंत्री

राज्यमंत्री

जितिन प्रसाद                  वाणिज्य अन् उद्योग, माहिती-तंत्रज्ञान

श्रीपाद नाईक          ऊर्जा, नुतनीकरण ऊर्जा

पंकज चौधरी           अर्थ

कृष्णपाल                 सहकार

रामदास आठवले            सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण

सुरेश गोपी                संस्कृती आणि पर्यटन

अजय टम्टा            रस्ते परिवहन

बंडी संजय कुमार            गृह

कमलेश पासवान            ग्रामीण विकास

भगिरथ चौधरी                कृषी आणि शेतकरी कल्याण

सतीशचंद्र दुबे                   कोळसा

संजय सेठ                 संरक्षण

रवनीत सिंह बिट्टू                   अन्नप्रक्रिया, रेल्वे

दुर्गादास उईके                  आदिवासी व्यवहार

रक्षा खडसे                युवा कार्य आणि क्रीडा

सुकांता मजुमदार          शिक्षण, ईशान्य विकास

सावित्री ठाकूर                  महिला आणि बालविकास

तोरखन  साहू          गृहनिर्माण आणि शहरविकास

राजभूषण चौधरी            जलशक्ती

भूपतिराजू श्रीनिवास वर्मा    अवजड उद्योग अन् इस्पात

हर्ष मल्होत्रा             रस्ते परिवहन, कॉर्पोरेट व्यवहार

निमुबेन  बांभनिया                  ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण

मुरलीधर मोहोळ            सहकार, नागरी विमानो•ाण

जॉर्ज कुरियन                   अल्पसंख्याक व्यवहार, पशूसंवर्धन, डेअरी

पवित्रा मार्गेरिटा              विदेश, वस्त्राsद्योग

शोभा करंदलाजे              लघु-मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार

रामनाथ ठाकूर                कृषी आणि शेतकरी कल्याण

नित्यानंद राय                 गृह

अनुप्रिया पटेल                 आरोग्य आणि कुटुंब कल्याण

व्ही. सोमण्णा                   जलशक्ती आणि रेल्वे

चंद्रशेखर पेम्मासानी             ग्रामविकास, दळणवळण

एस.पी. सिंह बघेल                   पंचायत राज, मत्स्योद्योग

कीर्तिवर्धन सिंह               पर्यावरण, वन, आणि विदेश

बी.एल. वर्मा            ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण

शांतनू ठाकूर           बंदर, जहाजबांधणी, जलमार्ग

एल. मुरुगन            माहिती-प्रसारण, संसदीय कामकाज

Advertisement

.