स्पिरिट’मध्ये प्रभाससोबत तृप्ति
प्रभासचा चित्रपट ‘स्पिरिट’ला मुख्य नायिका मिळाली आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने याची घोषणा केली आहे. पूर्वी या चित्रपटात दीपिका पदूकोनची नायिका म्हणून निवड करण्यात आली होती. परंतु आता तृप्ति डिमरी ‘स्पिरिट’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. तृप्तिने इन्स्टाग्राम हँडलवर टीम स्पिरिटमध्ये सामील झाल्याची पुष्टी दिली आहे. दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागल्यावर दीपिकाला चित्रपटातून वगळले आहे. दीपिकाने 8 तासांचा टाइम स्लॉट मागितला होता, यामुळे चित्रिकरणासाठी उपलब्ध वेळ 6 तासांनी कमी झाला. तसेच दीपिकाने चित्रपटाच्या नफ्यात हिस्सेदारीची मागणी केल्यावर स्थिती बिघडली. तसेच ती तेलगू भाषेतील संवाद बोलण्यास तयार नव्हती. स्पिरिट या चित्रपटाची निर्मिती भव्य स्तरावर करण्यात येत आहे. याचे चित्रिकरण एक वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. वांगा स्वत:च्या व्हिजनला मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी दमदार कलाकारांची निवड करत आहे. चित्रिकरण हैदराबादमध्ये सुरू होईल आणि मग आंतरराष्ट्रीय ठिकाणी देखील ते पार पडणार आहे.