इम्तियाज अलीच्या चित्रपटात तृप्ति
पुष्पा 2 मधील कलाकार फहाद फासिल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इम्तियाज अलीने स्वत:च्या आगामी चित्रपटासाठी फहादची निवड केली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तृप्ति डिमरी ही आघाडीची अभिनेत्री दिसून येणार आहे.
इम्तियाज अली या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत निर्मितीची जबाबदारी उचलणार आहे. चित्रपटात तृप्ति डिमरी ही फहादची नायिका असणार आहे. फहाद या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील स्वत:चा प्रवास सुरू होणार असल्याने फहाद उत्साहित आहे. इम्तियाजला प्रेमकथा वेगळ्या प्रकारे दर्शविण्यासाठी ओळखले जाते.
या चित्रपटाच्या कथेला सध्या अंतिम स्वरुप दिले जात आहे. निर्मितीचे काम पुढील वर्षात सुरू होणर आहे. इम्तिलाज अली हा स्वत:चा बॅनर विंडो सीट फिल्म्स अंतर्गत याची निर्मिती करणार आहे. तृप्तिने यापूर्वी इम्तियाजसोबत लैला मजनु या चित्रपटात काम केले होते. इम्तियाजनेच या चित्रपटाची कहाणी लिहिली होती. तर फहाद अलिकडेच पुष्पा 2 या चित्रपटात दिसून आला आहे.