‘बागी 4’मध्ये सोनम बाजवा
श्रद्धा कपूर-दिशा पाटनीचा पत्ता कट
टायगर श्रॉफचा आगामी चित्रपट बागी 4 हा सध्या चर्चेत आहे. अभिनेता संजय दत्त देखील यात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. बागी या फ्रेंचाइजीच्या मागील 3 चित्रपटांमध्ये श्रद्धा कपूर आणि दिशा पाटनी यांनी नायिकेची भूमिका साकारली होती. याचदरम्यान आता बागी 4 या चित्रपटात नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे.
2016 मध्ये बागी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि यात टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होती. 2018 मध्ये याचा सीक्वेल म्हणजेच बागी 2 प्रदर्शित झाला आणि यात दिशा पाटनी ही नायिका म्हणून झळकली होती. यानंतर 2020 मध्ये बागी 3 चित्रपटात श्रद्धा कपूरने पुन्हा या फ्रेंचाइजीत वापसी केली होती.
बागी 4 या चित्रपटात आता पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा ही टायगर श्रॉफची नायिका म्हणून झळकणार आहे. सोनम याचबरोबर हाउसफुल 5 या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बागी 4 हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.