For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तृप्ति डिमरीला मिळाला नवा चित्रपट

06:40 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
तृप्ति डिमरीला मिळाला नवा चित्रपट
Advertisement

धडक 2 चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत

Advertisement

करण जौहरने धर्मा प्रॉडक्शन्सचा नवा चित्रपट ‘धडक 2’ची घोषणा केली आहे. या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ति डिमरी मुख्य भूमिकेत असणार आहे. तर याचे दिग्दर्शन शाजिया इकबाल करणार आहे. चित्रपटाच्या ग्राफिकल पोस्टरमध्ये चित्रपटाच्या कहाणीची झलक दिसून येत आहे. तृप्ति डिमरीला या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करता येणार आहे.

ही कहाणी काहीशी वेगळी आहे, एक राजा होता आणि एक राणी होती, जात वेगळी होती, कहाणी समाप्त असे करण जौहरने एक व्हिडिओ शेअर कॅप्शनदाखल नमूद केले आहे. धडक चित्रपटाची निर्मिती देखील करणकडून करण्यात आली होती. यामुळे करण जौहर जुनी कहाणी नव्या स्वरुपात दाखविणार असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

याचबरोबर झी स्टुडिओ, धर्मा प्रॉडक्शन आणि क्लाउड 9 पिक्चर्सच्या बॅनर अंतर्गत निर्माण होणाऱ्या या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

धडक हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. शशांक खैतानच्या दिग्दर्शनातील या चित्रपटात जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने 110 कोटी रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती.

Advertisement
Tags :

.