For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तृप्ति डिमरीला मिळाली मोठी संधी

07:00 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
तृप्ति डिमरीला मिळाली मोठी संधी
Advertisement

‘अॅनिमल’मधील भूमिकेमुळे चर्चेत

Advertisement

अभिनेत्री तृप्ति डिमरी सध्या देशात चर्चेचा विषय ठरली आहे. अॅनिमल या चित्रपटात रणवीर कपूरसोबत काम केल्यावर ती सातत्याने प्रसिद्धीझोतात आहे. तृप्तिला आता न्यू नॅशनल क्रश ऑफ इंडिया म्हटले जात आहे. सोशल मीडियावर तिच्या पॅन फॉलोइंगमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे.  तिचा अॅनिमल हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आहे. या चित्रपटातील अभिनयानंतर तृप्तिकडे आता नव्या प्रोजेक्ट्सची रांगच लागली आहे. तृप्ति लवकरच आता टॉलिवूडमध्ये दिसून येणार असल्याचे समजते. दिल राजू यांच्या प्रॉडक्शन कंपनी अंतर्गत तृप्ति ही ‘मास महाराजा’ चित्रपटात रवि तेजा यांच्यासोबत झळकणार आहे. तृप्तिला ‘बुलबुल’ आणि ‘कलां’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. अॅनिमल चित्रपटात तिने जोया नावाच्या युवतीची भूमिका साकारली आहे. रणवीरसोबतच्या तिच्या काही दृश्यांमुळे ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. अभिनेत्रीच्या अभिनयाला अत्यंत पसंत केले जात आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.