कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ट्रम्प यांच्या आदेशाचा औषध निर्यातीवर परिणाम नाही

06:30 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उद्योग सूत्र व विविध विश्लेषकांच्या अभ्यासामधून नोंद

Advertisement

वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली

Advertisement

‘जगाची फार्मसी’ बनण्याचा प्रवास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशात औषधांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि औषध निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी एका कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये भारत हा अमेरिकेत औषधांचा प्रमुख निर्यातदार आहे. तथापि, उद्योग सूत्रे आणि विश्लेषकांचा असा विश्वास आहे की ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारतीय औषध निर्यातदारांवर थेट परिणाम होण्याची शक्यता खुप कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.

औषध कंपन्यांच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेत उत्पादन वाढवण्याचा निर्णय हा एक धोरणात्मक निर्णय आहे आणि तो काही उत्पादनांवर अवलंबून असेल. एका प्रमुख औषध कंपनीच्या मुख्य वित्तीय अधिकाऱ्याने सांगितले की ज्या उच्च-मार्जिन उत्पादनांसाठी भारतीय कंपनीने सह-विकास आणि विपणनासाठी अमेरिकेसोबत भागीदारी केली आहे, त्या उच्च-मार्जिन उत्पादनांसाठी ते अमेरिकेत उत्पादन युनिट स्थापन करण्याचा विचार करू शकते.

उत्पादन युनिटचा निर्णय बदलू शकतो

‘अमेरिकेत उत्पादन युनिट उघडण्याचा निर्णय कंपनी आणि उत्पादनानुसार बदलू शकतो. एकूणच ते व्यवहार्यतेवर अवलंबून असेल. सध्या कंपनीसाठी अशी कोणतीही योजना नाही. औषध उद्योगातील आणखी एका अनुभवी व्यक्तीने सांगितले की, अमेरिकेने देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणे स्वाभाविक आहे. रॉयटर्सने वृत्त दिले की एफडीए कमिशनर मार्टी मॅकार्थी यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करताना म्हटले होते की, नियामक परदेशी प्लांटची अचानक तपासणी सुरू करण्याचा मानस आहे. नियामक औषध उत्पादनाचे निरीक्षण अमेरिकन नियमांनुसार करावे अशी इच्छा करतो. ट्रम्पच्या या आदेशाचा भारतीय फार्मा कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम झाला.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article