कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ट्रम्प यांच्या सहकाऱ्याचे भारताला समर्थन

07:00 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

अमेरिकेतील उजव्या विचारसरणीच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटच्या सहकारी मानल्या गेलेल्या लौरा लूमर यांनी भारताच्या ‘सिंदूर’ अभियानाचे जोरदार समर्थन केले आहे. ‘या कार्यवाहीत भारताचाच विजय निश्चितपणे होणार’ असा भारताचा उत्साह वाढविणारा संदेश त्यांनी सोशल मिडियावर प्रसारित केला आहे. भारताने दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर काही तासांमध्येच त्यांनी हा संदेश ट्विटरवर प्रसारित केला आहे. त्यांच्या या संदेशाला थोड्याच वेळात 13 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून त्यांचा संदेश 2,500 हून अधिक वेळा पुर्नप्रसारित केला गेला आहे. लौरा लूमर या उजव्या विचारसरणीच्या असून कट्टर राष्ट्रवादी कार्यकर्त्या आहेत. त्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका प्रथम’ या धोरणाच्या खंद्या समर्थक आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार म्हणून फ्लोरिडा प्रांतातून अमेरिकन काँग्रेसचे सदस्यत्व मिळविण्यासाठी निवडणूकही लढविली होती. तथापि, त्यांना यश मिळू शकले नाही. त्या भारत समर्थक म्हणूनही ओळखल्या जात आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article