For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

त्रिपुरातील आमदार सुरजीत दत्ता कालवश

07:00 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
त्रिपुरातील आमदार सुरजीत दत्ता कालवश
Advertisement

अगरतळा : त्रिपुरातील रामनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरजीत दत्ता (70 वर्षे) यांचे बुधवारी निधन झाले आहे. राज्य सरकारने दत्ता यांच्या निधनानंतर एक दिवसीय राजकीय शोक घोषित केला आहे. भाजप आमदार असलेले दत्ता यांचे दीर्घ आजारानंतर कोलकात्यातील एका रुग्णालयात निधन झाले आहे. श्वसनावेळी त्रास होत असल्याने मंगळवारी अगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मग पुढील उपचारांसाठी कोलकाता येथे हलविण्यात आले होते. तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राज्यातील वरिष्ठ नेते आणि भाजप आमदार सुरजीत दत्ता यांच्या निधनामुळे मी दु:खी आहे. त्यांचे निधन म्हणजे राज्याची कधीच भरून न निघणारी हानी आहे. शोकाकुल कुटुंबाबद्दल संवेदना व्यक्त करतो असे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.