संसद परिसरात तृणमूल खासदाराकडून धूम्रपान
केंद्रीय मंत्र्यांनी सर्वांसमोर सुनावले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेच्या गुरुवारच्या कामकाजात ई&-सिगारेटच्या मुद्द्यामुळे काहीवेळ गदारोळ झाला होता. तृणमूल खासदार सभागृहात ई&-सिगारेट ओढत असल्याचा आरोप भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी केला होता. लोकसभा अध्यक्षांनी या मुद्द्यावर कारवाई केली नसली तरीही या घटनेनंतर तृणमूलचे आणखी एक खासदार सौगत रॉय हे संसद भवन परिसरात सिगारेट ओढताना दिसून आले. यादरम्यान त्यांची भेट केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि गजेंद्र सिंह शेखावतांसोबत झाली. आसपास पत्रकारांच्या उपस्थितीत त्यांच्यादरम्यान झालेली चर्चा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. केंद्रीय मंत्र्यांनी सभागृहात धूम्रपानावरून ज्येष्ठ खासदार सौगत रॉय यांना खडेबोल सुनावत त्यांच्या आरोग्य आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेवरून चिंता व्यक्त केली. यावर रॉय यांनी आपण सभागृहात धूम्रपान करत नसल्याचे आणि सभागृहाबाहेर सिगारेट ओढू शकत नसल्याचे सांगितले. यावर शेखावत यांनी तुम्ही स्वत:चे आरोग्य धोक्यात आणत आहात असे रॉय यांना सुनावले.
भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला होता. ई&-सिगारेटवर 2019 पासून बंदी आहे. जर कुणी खासदार सभागृहात ई&-सिगारेट ओढत असेल तर हा प्रकार सभागृहाच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचविणारा आहे. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. यातून तृणमूल काँग्रेस सभागृहाचा किती सन्मान करतात हे कळते असे उपरोधिक वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले.
यावर सौगत रॉय यांनी प्रत्युत्तर दिले. मी याविषयी काही बोलू शकत नाही, कारण मी त्यावेळी सभागृहात नव्हतो आणि कुणी धूम्रदान केले आणि कुणी तक्रार केली हे मला ठाऊक नाही. या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष घेऊ शकतात. नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई करण्यात यावी, याला राजकीय मुद्द्याचे स्वरुप दिले जाऊ नये असे रॉय यांनी नमूद पेले आहे.