हुतात्मा जवान निंगाप्पा चिखलकर यांना अभिवादन
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक गावचे सुपुत्र हुतात्मा जवान निंगाप्पा लक्ष्मण चिखलकर यांचा 37 वा पुण्यस्मरण दिवस ग्राम पंचायतीच्यावतीने शुक्रवार दि. 29 नोव्हेंबर रोजी मोठ्या गांभीर्याने पाळून अभिवादन करण्यात आले.
हुतात्मा जवान निंगाप्पा चिखलकर हे 29 नोव्हेंबर 1987 रोजी श्रीलंकेमध्ये शांतीसेनेमधून सेवा बजावत असतेवेळी तामिळी टायगर्स बरोबर झालेल्या चकमकीमध्ये अनेक टागयर्सना कंठस्थान पाडले. परंतु यावेळी झालेल्या चकमकीमध्ये ते हुतात्मा झाले. आणि कंग्राळी बुद्रुक गावाबरोबर भारत देशाचे नाव अजरामर केले. अशा भावनिक शब्दात त्यांच्या शौर्याचे अभिनंदन करत अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रा.पं. सदस्य सद्याप्पा राजकट्टी, अनिल पावशे, पूनम पाटील, कल्पना पवार, भारता पाटील आदींच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील व माजी ग्रा.पं. अध्यक्ष गजानन पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.