शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली
बेळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने सोमवारी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आयोजिण्यात आला होता. रामलिंगखिंड गल्ली येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, माजी महापौर सरिता पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले, शुभम शेळके, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, नगरसेवक रवी साळुंखे, माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सीमाप्रश्न सुटावा यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले, असे यावेळी सांगण्यात आले. मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून बाळासाहेबांच्या स्मृतीला उजाळा दिला. यावेळी दिलीप बैलूरकर, महेश टंकसाळी, राजकुमार बोकडे, रमेश माळवी, पिराजी शिंदे, विनायक हुलजी, विनायक बेळगावकर, धनंजय पाटील, यल्लाप्पा मुचंडीकर यांच्यासह इतर उपस्थित होते.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कोरे गल्ली
गोवावेस कोरे गल्ली, शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व तरुण मित्र मंडळाच्यावतीने हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. संजय बोकडे यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. रणजित हावळाण्णाचे यांनी शिवसेनेची स्थापना तसेच सीमालढ्यातील बाळासाहेबांचे योगदान याविषयी माहिती दिली. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते समीत पाटील, रवी जाधव, दीपक गवंडळकर, विजय डम्म, युवराज हावळाण्णाचे, महेश कुंडेकर, रोहित वायचळ, भाऊ मजुकर, परशराम शिंदे यांच्यासह इतर उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन वडगाव येथील सोमेश्वर हॉल, मंगाईनगर येथे झाला. या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
प्रारंभी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांचे सीमाप्रश्नासाठीचे योगदान याविषयी माहिती दिली. यावेळी उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, विठ्ठल उंदरे, अमर कडगावकर, संजय चतूर, मंगेश नागोजीचे, श्रीधर बिर्जे, रमेश कडुलकर, सहदेव रेमाण्णाचे, मंगेश पोटे, शुभम पवार, ज्ञानेश्वर गोंधळी, बाळू भोसले यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.