For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिंदवी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार

10:01 AM Mar 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिंदवी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सत्कार
Advertisement

येळ्ळूर : हिंदवी स्वराज्य संघटनेच्यावतीने व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून महाराष्ट्र चौक येळ्ळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पंचधातू मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. हिंदवी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्र्रम व येळ्ळूर ग्रामस्थांच्या सहकार्यातून त्यांनी हे काम पूर्ण केले. याबद्दल हिंदवी स्वराज्य संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचा गौरव महाराष्ट्र हायस्कूलच्यावतीने करण्यात आला. अध्यक्षस्थानी समाज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र गिंडे होते. पाहुणे म्हणून संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर, समाज शिक्षण संस्थेचे संचालक रावजी पाटील,  पुंडलिक मेणसे तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सी. एम. गोरल उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन हिंदवी स्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर व उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत गायिले. मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर हायस्कूलच्यावतीने उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचा गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. प्रा. सी. एम. गोरल म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार चालविली,  रणांगण गाजविले, शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. आपण लढू शकतो व जिंकूही शकतो हे त्यांनी दाखवून दिल्याचे सांगितले. यावेळी प्रशांत मजुकर यांनी सुऊवातीपासून प्राणप्रतिष्ठा होईपर्यंतची वाटचाल कथन केली. संघटनेचे उपाध्यक्ष परशराम पाटील, कार्याध्यक्ष अश्विन मालूचे, सचिव चांगदेव मुरकुटे, उपसचिव राहुल उडकेकर, खजिनदार दिनकर घाडी, उपखजिनदार माऊती शहापूरकर, ग्रा.पं. सदस्य राकेश परीट, जोतिबा उडकेकर, अनिल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक अनिल हुंदरे यांनी केले तर के. बी. पोटे यांनी आभार मानले.

Advertisement

Advertisement
Tags :

.