For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंदार कोल्हटकर-धीरज पाटील यांना तरुण भारत परिवारातर्फे श्रद्धांजली

10:57 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंदार कोल्हटकर धीरज पाटील यांना तरुण भारत परिवारातर्फे श्रद्धांजली
Advertisement

बेळगाव : ‘तरुण भारत संवाद’च्या सातारा आवृत्तीमध्ये वितरण विभागात कार्यरत असणारे मंदार कोल्हटकर व धीरज पाटील यांच्या अपघाती निधनाबद्दल तरुण भारत परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी पुणे-बेंगळूर महामार्गावरील वाईनजीक एका कारने धडक दिल्याने हे दोघे दुचाकीवरून बाजूला फेकले गेले व त्यातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने तरुण भारत परिवारावर शोककळा पसरली आहे. तरुण भारतच्या कार्यकारी संचालक रोमा ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत बेळगाव कार्यालयामध्ये श्रद्धांजली सभा घेण्यात आली. आपल्या दोन सहकाऱ्यांचे अपघाती निधन व्हावे ही अतिशय दु:खदायक बाब असल्याची भावना व्यक्त करून त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात तरुण भारत परिवार सहभागी आहे, असे त्या म्हणाल्या. दोन मिनिटे मौन पाळून तरुण भारत परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात  केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.