For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रस्ता ओलांडताना आराम बसच्या धडकेत महिला ठार; परिते गावातील घटना

02:11 PM May 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
रस्ता ओलांडताना आराम बसच्या धडकेत महिला ठार  परिते गावातील घटना
Kolhapur Parite accident
Advertisement

भोगावती/प्रतिनिधी

कोल्हापूर ते भोगावती मार्गावरील परिते (ता.करवीर) गावातून रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव धावणाऱ्या आराम बसने जोरदार धडक दिली.या अपघातात श्रीमती अंजनी रंगराव पाटील (वय ६५) या जागीच ठार झाल्या आहेत.परिते गावात बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Advertisement

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अंजनी पाटील या सकाळी सात वाजण्याच्याच्या सुमारास कामानिमित्त घरातून बाहेर पडल्या होत्या.याच वेळेला रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून पणजी कडे जाणाऱ्या भरधाव आराम बस क्रमांक (टी एस १२ यु ई ०३८२) ने त्यांना जोरात धडक दिली.यामुळे फरफटत गेल्याने श्रीमती अंजनी पाटील जागीच ठार झाल्या आहेत.परीते गावा जवळच हा भीषण अपघात सात वाजून दहा मिनीटांनी घडल्याने घटनास्थळावर ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.मात्र उपस्थित ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीत करून एकेरी वाहतूक सुरू झाली.

Advertisement
Advertisement
Tags :

.