कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माजी आमदार कै.प्रल्हाद रेमाणी यांना श्रद्धांजली

11:28 AM Feb 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सातव्या पुण्यस्मरणानिमित्त खानापुरातील मलप्रभा नदी घाटावर प्रतिमेचे पूजन

Advertisement

खानापूर : राजकीय क्षेत्रातील माणूस आपल्या भरीव कार्यातून आपली प्रतिमा निर्माण करतो. माणसाच्या जीवनात प्रत्येकाला शेवट आहे. मात्र आपल्या कार्यातून कायमस्वरुपी आजरामर होण्यासाठी ध्येय बाळगून काम करावे लागते. त्यापैकीच आमदार प्रल्हाद रेमाणी एक होय. त्यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अतिशय प्रामाणिक प्रयत्न केले. मलप्रभा नदी तिरावर घाट निर्माण करून आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवलेला आहे. असे उद्गार आमदार विठ्ठल हलगेकर यांनी माजी आमदार कै. प्रल्हाद रेमाणी यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली अर्पण करताना काढले. येथील नदी घाटावर माजी आमदार प्रल्हाद रेमाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदरांजली अर्पण करण्यात आली. खानापूर तालुका भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कुबल म्हणाले, तालुक्याच्या विकासाचे ध्येय बाळगून अहोरात्र कार्यरत राहून सामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत कार्यशील राहिलेले आणि धर्माच्या कामासाठी कायम अग्रेसर राहून कार्य करणारे माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांची आठवण प्रकर्षाने येते.

Advertisement

तालुक्यात भाजप उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यावेळी प्रमोद कोचेरी म्हणाले, विकासाचे ध्येय बाळगून पराभवाने न खचता सतत कार्यरत राहून भाजपची उभारणी करणारे विकास पुरुष म्हणजेच आमदार प्रल्हाद रेमाणी. भाग्यलक्ष्मी सोसायटीचे संचालक प्रकाश देशपांडे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंद देसाई, यांनी प्रल्हाद रेमाणी यांनी खानापूर शहरासह तालुक्यात केलेल्या विकास कामांचा आढावा मांडून श्रद्धांजली वाहिली. यावेळी कै. प्रल्हाद रेमाणी यांचे सुपुत्र माजी जि. पं. सदस्य ज्योतिबा रेमाणी,  सचिव मल्लाप्पा मारिहाळ, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश देसाई, माजी ता. पं. सभापती सयाजी पाटील, नगरसेवक अप्पय्या कोडोळी, गुंडू तोपिनकट्टी, चेतन मणेरीकर, सुनिल प्रभू, विष्णू काद्रोळकर, अशोक देसाई, प्रविण पाटील, बाबासाहेब देसाई, आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांच्या मुळगावी झाडनावगा येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत कै. प्रल्हाद रेमाणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article