For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर’ सीरिज येतेय

06:13 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर’ सीरिज येतेय
Advertisement

सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात येणार वादळ

Advertisement

सध्या वेबसीरिजची लोकांमध्ये क्रेझ आहे. पंचायत आणि मिर्झापूर यासारख्या सीरिजसाठी लोकांमध्ये असलेले वेड पाहता निर्माते नवनव्या संकल्पनांसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अमेझॉन प्राइम व्हिडिओची वेबसीरिज ‘मिर्झापूर 3’ काही दिवसांपूर्वीच स्ट्रीम झाली आहे.  आता या क्राइम थ्रिलर वेबसीरिजनंतर क्रिएटर एक नवी कहाणी घेऊन येत आहेत. एका सीए टॉपरला हतबलतेपोटी काय काय करावे लागते याची ही कहाणी असणार आहे. या वेबसीरिजचे नाव ‘सीए टॉपर त्रिभुवन मिश्रा’ आहे. याचा ट्रेलर जारी करण्यात आला आहे.

चार्टर्ड अकौंटिंगमध्ये अव्वल आल्यावरही स्वत:च्या जीवनात कशाप्रकारे सामान्य व्यक्तीला संघर्ष करावा लागतो याची कहाणी यात दर्शविण्यात आली आहे. मुख्य पात्र त्रिभुवन मिश्रा असून ते अभिनेता मानव कौलने साकारले आहे. स्वत:च्या हतबलतेमुळे हा सीए चुकीच्या मार्गावर जात असल्याचे दाखविण्यात आले आहे.

Advertisement

या सीरिजमध्ये ‘पंचायत’मधील प्रल्हाद चा ही भूमिका साकारणारा कलाकार पोलीस अधिकाऱ्याच्या भुमिकेत दिसून येणार आहे. याचबरेबर मिर्झापूर सीरिजमध्ये जौनपूरचा डान साकारलेले रति शंकर शुक्ला यांनीही यात अभिनय केला आहे. ही सीरिज 18 जुलै लोकांसमोर येणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :

.