पुन्हा दिग्दर्शन करणार कोंकणा
कोंकणा सेन शर्माने केवळ एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर दिग्दर्शिका म्हणूनही ओळख निर्माण केली आहे. 2016 मध्ये तिने ‘डेथ इन द गंज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच ती ‘लस्ट स्टोरीज 2’ची सह-दिग्दर्शिका राहिली आहे. आता अभिनेत्रीने स्वत:च्या आगामी दिग्दर्शकीय प्रोजेक्टविषयी माहिती दिली आहे.
एक कॉमेडी शोचे दिग्दर्शन करणार आहे. याची कहाणी मी स्वत:चा महाविद्यालयीन मित्र जयदीप सरकारसोबत मिळून लिहित आहे. या प्रोजेक्टवरून मी काहीशी घाबरलेली असली तरीही याच्या कामात मजा येणार असल्याचे तिने म्हटले आहे.
कोंकणा सेन शर्मा स्वत:च्या दिग्दर्शकीय शोमध्ये काम करणार नसल्याचे समजते. माझ्याकडे अनेक चांगले कलाकार आहेत, यामुळे मी गोष्टींना स्वत:साठी अवघड करणार नाही. कलाकार प्रोजेक्ट स्वत: लिहितात आणि त्याचे दिग्दर्शन करतात, परंतु माझ्याकडे सध्या ती क्षमता नसल्याचे कोंकणाने म्हटले आहे.
कोंकणाने ‘पेज 3’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अलिकडेच ती लाइन इन ए मेट्रोच्या सीक्वेलमध्ये दिसून आली होती. तसेच तिची एक वेबसीरिज अलिकडेच प्रदर्शित झाली असून तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.