कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पहलगाम हल्ल्यासाठी टीआरएफ जबाबदार

06:45 AM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संयुक्त राष्ट्राचा अहवाल : ‘लष्कर-ए-तोयबा’चा सहभागही उघड

Advertisement

वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्र

Advertisement

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (युएनएससी) सॅक्शन्स मॉनिटरिंग टीमने बुधवारी जागतिक दहशतवादी संघटनांसंबंधीचा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात पहलगाम हल्ल्यासाठी द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) जबाबदार असल्याचे त्यांनी मान्य केले. अहवालानुसार, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) मदतीशिवाय हा हल्ला शक्य नव्हता. टीआरएफ आणि एलईटी यांच्यात मिलिभगत असल्याचेही त्यात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचा 36 वा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून तो आयएसआयएल, अल-कायदा आणि त्यांच्याशी संबंधित गटांच्या दहशतवादी संघटनांवर आधारित आहे. अहवालानुसार, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या (एलईटी) मदतीशिवाय हा हल्ला शक्य नव्हता असे म्हटले आहे. तसेच पहलगाम परिसरातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे आणि दहशतवादी संघटना पुन्हा या तणावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, असेही स्पष्ट केले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर टीआरएफने दोनदा जबाबदारी घेतली होती. टीआरएफने हल्ल्याच्या दिवशी 22 एप्रिल रोजी घटनास्थळाचा फोटोही प्रकाशित केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा जबाबदारी घेतली होती. परंतु 26 एप्रिल रोजी अचानक आपला दावा मागे घेतला. यानंतर, टीआरएफने पुढे कोणतेही विधान केले नाही. तसेच तयानंतर इतर कोणत्याही संघटनेनेही हल्ल्याची जबाबदारी घेतली नसली तरी या हल्ल्यामागे ‘टीआरएफ’ हीच संघटना असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. 22 एप्रिल रोजी पहलगामच्या ब्यासरण खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करत हाहाकार माजवला होता. यादरम्यान, 1 नेपाळी नागरिकासह 26 जणांचा मृत्यू झाला होता.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने 25 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे एक प्रेस स्टेटमेंट जारी केले, परंतु त्यात टीआरएफचे नाव समाविष्ट नव्हते. यानंतर, ‘आम्ही टीआरएफचे नाव काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि ते यशस्वीरित्या काढून टाकण्यात आले.’ असे वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी केले होते.

अमेरिकेकडून टीआरएफ दहशतवादी संघटना घोषित

यापूर्वी 18 जुलै रोजी अमेरिकेने पाकिस्तान समर्थित द रेझिस्टन्स फ्रंटला (टीआरएफ) परदेशी दहशतवादी संघटना (एफटीओ) आणि विशेष नियुक्त जागतिक दहशतवादी (एसडीजीटी) च्या यादीत टाकले होते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी ही माहिती दिली होती. ‘लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) मुखवटा आणि प्रॉक्सी संघटना असलेल्या टीआरएफने 22 एप्रिल 2025 रोजी भारतातील पहलगाम येथे दहशत माजवत 26 नागरिकांचा बळी घेतला होता. त्यानंतर टीआरएफने हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली होती. 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने भारतातील नागरिकांवर केलेला हा सर्वात घातक हल्ला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article