औराद येथे वृक्षारोपण कार्यक्रम व महासिद्ध हंडे यांचा सत्कार
दक्षिण सोलापूर :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील राऊंड टेबल यशवंत विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी महासिद्ध हंडे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी मुख्याध्यापक संगण्णा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला गावातील मान्यवर आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित मान्यवरांमध्ये सरपंच शशिकांत बिराजदार, समितीचे माजी उपसभापती संदीप टेळे, माजी सरपंच शांतकुमार गडदे, माजी उपसरपंच अरविंद शेतसंदी, इराण्णा बनसोडे, पोलीस पाटील सैपन बेगडे, पत्रकार बिसलसिद्ध काळे,शाळेच्या मुख्याध्यापिका आर. ए. दशवंत व शिक्षकवर्ग लक्ष्मीकांत बिराजदार, राठोड एल. झेड., जमादार जी. आय., वाघमोडे एस. ए., गुज्जा व्ही. एस., बिडवे एन. बी., बिदनुरे डी. एस., बिराजदार एल. एच. पाटील पी. एस. पोतदार एस. जी. सदरखेड एस. एस. इसाके पी. टी कमळे एस. एल.बगले ए. आर.बिराजदार एस. ए. शिक्षकेतर कर्मचारी सुतार एस. आर., खांडेकर एस. एस., बगले एस. डी., कमळे व्ही. एन. आदी मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या पार पडले असून, वृक्षारोपण आणि सामाजिक सन्मान या उपक्रमामुळे पर्यावरण जपण्याबरोबरच सामाजिक सलोखा आणि नेतृत्वाला प्रोत्साहन मिळाले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.