महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहर परिसरात झाडे कोसळण्याचे सत्र सुरूच

10:46 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वनखात्याकडून धोकादायक वृक्ष हटविण्याची मोहीम

Advertisement

बेळगाव : अतिवृष्टीमुळे शहर परिसरात झाडे पडण्याचे सत्र सुरूच आहे. जीर्ण झालेली जुनाट झाडे ठिकठिकाणी कोसळून मोठे नुकसान झाले आहे. शहरामध्ये संभाजी गल्लीतील मागील बाजूस असणाऱ्या शाळेजवळील वृक्ष कोसळून दुचाकीचे नुकसान झाले आहे. तर अगसगे रस्त्यावर वृक्ष कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. या बरोबरच केएलई येथील धोकादायक झाडे काढण्यात येत आहेत. धोकादायक वृक्षांचा प्रश्न लक्षात घेत शहरातील धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली होती.

Advertisement

याबरोबरच वनखात्याकडेही करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामध्ये केएलई येथील भलामोठा वृक्ष अचानक कोसळला होता. यामुळे रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेल्या चारचाकी वाहनासह दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या रस्त्यावरील धोकादायक वृक्षांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याची दखल घेऊन वनखात्याकडून धोकादायक वृक्ष हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुधवारी केएलई येथील अनेक धोकादायक वृक्ष वनखात्याच्या पुढाकारातून हटविण्यात आली आहे. क्रेनची मदत घेऊन सदर वृक्ष हटविण्यात येत होते.

संभाजी गल्ली येथील मागील बाजूस असणाऱ्या शाळेजवळील वृक्ष अचानक कोसळल्याने दुचाकीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीच मोठी हानी झाली नाही. जवळच असणाऱ्या शाळेवर हा वृक्ष कोसळला असता तर शाळेचे मोठे नुकसान झाले असते. घटनेची माहिती मिळताच वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कोसळलेला वृक्ष हटविला व वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला. अगसगे रस्त्याशेजारी वृक्ष कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काटेरी वृक्ष असल्याने सर्वसामान्य नागरिकांना सदर वृक्ष हटविणे अडचणीचे जात आहे. त्यामुळे रहदारीला अडचण निर्माण झाली आहे. हा वृक्ष त्वरित हटविण्याची मागणी वाहनधारकांतून केली जात आहे. दुतर्फा वाहतुकी दरम्यान अपघात घडण्याची शक्यता असून सामाजिक वनीकरण विभागाने याची दखल घेऊन वृक्ष हटवावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article