2100 पर्यंत उत्तर गोलार्धात वृक्षसंपदा वाढणार
तापमानात घट,बर्फ वितळल्याने उगणार नव्या वनस्पती
पृथ्वीच्या उत्तर हिस्स्यात आगामी काळात वृक्षसंपदा इतक्या वेगाने वाढणार आहे की, ती सद्यकाळाच्या तुलनेत 2.25 पट अधिक होईल. ही बाब दिलासा देणारी वाटत असली तरी यामागील धोका गंभीर आहे. एका अध्ययनानुसार ही नकोशी असलेली वृक्षसंपदा हवामान बदलाच्या किमतीवर प्राप्त होणार असून हीच मोठी चिंता आहे. ग्लोबल चेंज बायोलॉजी नियतकालिकात प्रकाशित अध्ययनानुसार उत्तर गोलार्ध 2100 पर्यंत वृक्षसंपदेने बहरणार आहे. वैज्ञानिकांनुसार ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन डायऑक्साइडच्या अधिक प्रमाणामुळे तेथील जमिनीवर वनस्पतींचा विस्तार होईल. या अनुमानापर्यंत पोहोचण्यासाठी संशोधकांनी जीजीएमएओसी नावाच्या प्रगत मॉडेलचा वापर केला, ज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच मशीन लर्निंगच्या 6 वेगवेगळ्या तंत्रज्ञानांना मिळून भविष्यातील वनस्पती वृद्धीचा आराखडा तयार केला. या मॉडेलने लीफ एरिया इंडेक्सच्या आधारावर उत्तर क्षेत्रात हा आकडा 1982-2014 च्या तुलनेत 2.25 पटीपर्यंत वाढू शकतो, असे सांगितले आहे.
या क्षेत्रांवर सर्वाधिक प्रभाव
उत्तर गोलार्धात आशियाचा बहुतांश भाग सामील आहे. पूर्ण युरोप याच गोलार्धात आहे, ज्यात फ्रान्स, जर्मनी, इटली, ब्रिटन आणि स्वीडन यासारखे देश सामील आहेत. उत्तर अमेरिका, अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको देखील उत्तर गोलार्धात आहे. याचबरोबर आफ्रिकेचा उत्तर भाग म्हणजेच इजिप्त, अल्जीरिया, मोरक्को आणि लीबिया तसेच दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला, कोलंबिया, इक्वेडोर देखील याच गोलार्धात आहे. आर्क्टिक महासागर, उत्तर अटलांटिक आणि उत्तर प्रशांत महासागराचे हिस्सेही यात सामील आहेत.
भारताची जैवविविधता होणार प्रभावित
हिमालय क्षेत्रही पर्माफ्रॉस्ट आणि ग्लेशियर्सयुक्त क्षेत्र आहे. तेथील पर्यावरणीय गडबडीमुळे पूर, भूस्खलन आणि ऋतुचक्रात असंतुलन होऊ शकते. वृक्षसंपदेचा असामान्य फैलाव कृषीचक्र आणि जैवविविधतेता प्रभावित करू शकतो. वृक्षसंपदा स्वत:सोबत नव्या संकटांना घेऊन येणार आहे. जुनी परिस्थितीय व्यवस्था एक तर संपुष्टात येईल किंवा बदलणार आहे.