महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रत्नागिरीत पथमा नवजात अर्भकावर (1365 ग्रॅम) ‘लिसा' उपचार

01:25 PM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालय विशेष नवजात शिशु काळजी कक्ष : 42 दिवसांनंतर अर्भकाला सोडले घरी

Advertisement

रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकिय रुग्णालय, रत्नागिरी येथे विशेष नवजात शिशु काळजी कक्षात रत्नागिरी मध्ये प्रथमच लिसा या अत्याधुनिक पद्धतीने अर्भकाला उपचार करण्यात आला. मातेला रुग्णालयामधून मोफत आहार पुरविण्याबरोबरा बाळाच्या डोळयाची रोप तपासणी आणि उपचार खाजगी रुग्णालयामधून मोफत करुन घेण्यात आली आणि 42 दिवसांनंतर त्या अर्भकाला वैद्यकीय सल्ल्याने घरी सोडण्यात आले. जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी विशेष नवजात शिशु काळजी कक्ष (स्पेशल न्यू बार्न केअर युनिट) येथे 24 एपिल रोजी सकाळी 3.22 वाजता श्रीम महेक जांभारकर, मु.पो. पडवे, गुहागर, जि. रत्नागिरी यांचे स्त्राr जातीच्या अर्भकाला दाखल करण्यात आले. त्यांया बालकाचा जन्म हा चिंतामणी हॉस्पिटल, रत्नागिरी येथे 24 एपिल 2024 रोजी सकाळी 2.22 वाजता झाला होता.

Advertisement

बालक जन्मत खूपच कमी वजनाचे (1365 ग्रॅम) व कमी दिवसाचे (32 आठवडे) होते. बाळाची परिस्थिती अत्यंत नाजूक होती. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप, अती शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंबरीश आगाशे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएनसीयु विभागामध्ये कार्यरत बालरोगतज्ञ डॉ. विजय सूर्यागंध, डॉ. शायान पावसकर (सहाय्यक प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी) व डॉ. आदित्य वडगावकर (वरिष्ठ निवासी डॉक्टर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी) तसेच अधिसेविका जयश्री शिरधनकर, बालरोगतज्ञ परिचारीका श्रुती जाधव व कक्ष परिसेविका सुवर्णा कदम तसेच कार्यरत अधिपरिचारीका यांच्या अथक परिश्रमाने बालकात सुधारणा होत गेली. रत्नागिरीत प्रथमच लिसा या अत्याधुनिक पद्धतीने अर्भकाला उपचार करण्यात आला. 42 दिवसांनतर 5 मे रोजी डॉक्टरांच्या सल्याने अर्भकाला घरी सोडण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article