महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

1962 टोल फ्री अंतर्गत जनावरांना उपचार सुविधा

10:41 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पशु संजीवनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या जनावरांना तात्काळ उपचार देण्यासाठी पशु रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. यासाठी 1962 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास या सेवेचा लाभ करून दिला जाणार आहे. जिल्ह्यामध्ये 17 रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये जून महिन्यात 1092 कॉल करण्यात आले असून या अंतर्गत 2196 जनावरांना उपचार देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ही सेवा देण्यात आली आहे. सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीतही ही सेवा कार्यरत असणार आहे. गरजू शेतकऱ्यानी आजारी पडलेल्या जनावरांना उपचार देण्यासाठी 1962 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article