बुडालेल्या जहाजातून मिळाला खजिना
350 वर्षांपूर्वी बुडाले होते स्पेनच्या राजाचे जहाज
एखादे जुने जहाज किंवा जुन्या घरातून अनमोल खजिना लोकांच्या हाती लागत असल्याचे तुम्ही कुठल्या तरी हॉलिवूडपटामध्ये पाहिले असेल. परंतु स्पेनमध्ये फिल्मी वाटणारी कहाणी सत्यात उतरली आहे. येथील संशोधकांच्या एका पथकाला एका जुन्या, तुटलेल्या जहाजात मौल्यवान खजिना मिळाला आहे. हा खजिना अत्यंत जुनाअसल्याने याची किंमत देखील प्रचंड आहे. हा खजिना एखाद्या माणसाचेच नव्हे तर देशाचेच नशीब बदलू शकतो.
संशोधकांच्या पथकाला एका बुडालेल्या स्पॅनिश जहाजात 350 वर्षे जुना खजिना मिळाला आहे. हा खजिना सागरी प्रवासावर निघणऱया राजांचा असल्याचे मानले जातेय. या खजिन्यात जुनी नाणी, किमती रत्न अन् धातू आहेत, ज्यांची किंमत लाखो डॉलर्समध्ये आहे.
1656 मध्ये बुडाले होते जहाज
द नुएस्ट्रा सेनोरा डे लास या स्पेनच्या जहाजावर हा खजिना मिळाला आहे. या स्पॅनिश नावाचा अर्थ ‘अवर लेडी ऑफ वंडर्स’ असा आहे. हे जहाज 1656 मध्ये एका नौकेला धडकून बहामासनजीक बुडाले होते. संशोधकांनुसार हे जहाज खजिना घेऊन जात होते. किंग फिलिप चौथ्यासाठी राखी कराच्या स्वरुपात हा खजिना होता. जहाज क्यूबामधून स्पेनच्या सेविलीच्या दिशेने प्रवास करत होते. बुडालेले जहाज 891 टन वजनाचे होते आणि यावर अन्य सामग्रीही भरलेली होती.
शोधकार्यात तंत्रज्ञानाचा वापर
1650 ते 1990 पर्यत या जहाजावरील 35 लाख वस्तू प्राप्त करण्यात आल्या होत्या अशी माहिती जुन्या जहाजांचा शोध घेणारी संस्था एलन एक्सप्लोरेशनकडून देण्यात आली. 2020 पासून एलन दोन वर्षांपर्यंत जहाजांचा शोध घेत होते. हाती लागलेला खजिना बहामास मॅरिटाइम म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या खजिन्याला रिमोट सेंसिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने शोधले जाऊ शकते. याकरता सोनार आणि मॅग्नेटोमीटर्सचा वापर केला जातो. एलनकडून 13 किलोमीटर अंतरापर्यंत फैलावलेले अवशेष शोधण्यात आले आहेत.