घराच्या सफाईदरम्यान हाती लागला ‘खजिना’
मिळाली सुपरमॅन नंबर 1 ची पहिली प्रत 81 कोटी रुपयांमध्ये झाला लिलाव
घराची सफाई करताना अनेकदा अनेक वर्षे जुनी मूल्यवान गोष्ट हाती लागते. अमेरिकेच्या टेक्सासमध्ये तीन भावांनी स्वत:च्या आईच्या सामानातून एक कॉमिक शोधले असून याची किंमत 9.12 दशलक्ष डॉलर्स (जवळपास 81 कोटी रुपये) आहे. प्रत्यक्षात ही प्रसिद्ध सुपरहीरो ‘सुपरमॅन नंबर 1’च्या पहिल्या कॉमिकची प्रत आहे. 81 कोटी रुपयांमध्ये विकण्यात आल्यावर हे जगातील सर्वात महाग कॉमिक ठरले आहे.
आईच्या सामानात मिळाली कॉमिक
तीन भावांच्या आईचे मागील वर्षी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये निधन झाले होते. हे तिन्ही भाऊ अलिकडेच घराची सफाई करत होते, तेव्हा त्यांना आईचा एक कार्डबोर्ड मिळाला. यात काही वृत्तपत्रांची कात्रणं होती. जेव्हा सर्वांनी कार्डबोर्ड उघडून पाहिल्यावर त्यांना सर्वात जुन्या कॉमिक्सचा संग्रह आढळून आला.
आईने दिली होती माहिती
संबंधित महिलेने अनेक मूल्यवान कॉमिक बुक्सचा संग्रह असल्याचे स्वत:च्या मुलांना सांगितले होते. परंतु तिच्या मुलांनी कधीच हा संग्रह पाहिला नव्हता. महिलेच्या मृत्यूनंतर मुलांनी घर विकण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान ते तळघरातील एका खोलीत गेले असता ही
कॉमिक मिळाल्याचे कॉमिक अॅट हेरिटेज
ऑक्शनचे उपाध्यक्ष लॉन एलन यांनी सांगितले आहे. तिन्ही भावांनी कॉमिकचा बॉक्स उघडल्यावर त्यांना लिलाव करणाऱ्या कंपनीचा संदेश मिळाला. एलन या कॉमिकची सत्यता पडताळण्यासाठी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पोहोचले. त्यांनी सुपरमॅनची प्रत तपासण्यासाठी तज्ञांकडे पाठविली असता ही कॉमिकची पहिली प्रत असल्याचे स्पष्ट झाले.
जगातील सर्वात महाग कॉमिक
सुपरमॅनच्या पहिल्या आवृत्तीत 5 लाख प्रती प्रकाशित करण्यात आल्या होत्या आणि ही प्रत त्याचपैकी एक होती. या कॉमिकचा लिलाव 9.12 दशलक्ष डॉलर्समध्ये झाल्याने ही जगातील सर्वात महाग कॉमिक ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम ‘अॅक्शन कॉमिक नंबर 1’च्या नावावर होता, तिला 6 दशलक्ष डॉलर्स (जवळपास 53 कोटी रुपये) ही किंमत लिलावात प्राप्त झाली होती.