For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

1800 वर्षापूर्वी जळालेल्या घराखाली मिळाला खजिना

06:15 AM Sep 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
1800 वर्षापूर्वी जळालेल्या घराखाली मिळाला खजिना
Advertisement

बंद बॉक्समध्ये होती नाणी अन् मूर्ती

Advertisement

रोमानियात पुरातत्वतज्ञांना एका रोमन परिवाराच्या जळालेल्या घराखाली प्राचीन  खजिना मिळाला आहे. हे घर सुमारे 1800 वर्षांपूर्वी बहरलेल्या एका जुन्या शहराचा हिस्सा होते. शतकांपासून याचे अवशेष जमिनीखाली दडलेले होते. रोमानियाच्या राष्ट्रीय इतिहास संग्रहालयाकडून या शोधाची घोषणा करण्यात आली आहे. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर असलेले प्राचीन युनानी शहर हिस्ट्रियाच्या अवशेषांमध्ये हा खजिना मिळाला आहे.

सोन्याची नाणी, मूर्ती अन् भांडी

Advertisement

या खजिन्यात 40 हून अधिक सोन्याची नाणी आणि बहुमूल्य धातूंनी निर्मित अनेक प्राचीन दागिने तसेच मूर्ती मिळाल्या आहेत. हा खजिना एका अशा घराखाली सापडला, जे रोमन काळात आगीमुळे नष्ट झाले होते. जळालेल्या प्राचीन  घराच्या जमिनीखाली अनेक कलाकृतीही मिळाल्या आहेत, यात शिलालेख, चिनी मातीची भांडी, कांस्य, लोखंड, काच आणि दगडी वस्तू सामील आहेत.

सोन्याच्या नाण्यांचा बदलला रंग

येथे मिळालेली नाणी शतकांपासून जमिनीत गाडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांना गंज चढली होती आणि त्यांचा रंग हिरवा झाला होता. तरीही त्यांचा आकार कायम आहे. हा खजिना एका लाकडी पेटीत लपविण्यात आला होता, जो आग लागण्यादरम्यान स्वत:चा आकार कायम ठेवत परस्परांमध्ये जोडले गेल्याचे पुरातत्वतज्ञांचे मानणे आहे. हे घर दुसऱ्या शतकाच्या मध्यापासून तिसऱ्या शतकाच्या मध्यापर्यंत एखाद्या महत्त्वपूर्ण परिवाराचे राहिले असावे. तेथे मूल्यवान सामग्री एका विशेष स्थानी ठेवण्यात आली होती. तरीही आग लागल्यावर त्याला वाचविता येऊ शकले नाही असे संशोधकांचे मानणे आहे.

घराची संरचना आकर्षक

घरात चुनादगडाचे पदपथ आणि रंगलेल्या भिंती होत्या, संशोधकांनी या संरचनेला आकर्षक ठरविले आहे, संपन्न रोमन लोकांच्या जीवनस्थितीला दर्शविणारी ही संरचना आहे. नाण्यांना जुन्या रुपात संग्रहित करण्यासाठी त्यांना प्रयोगशाळेत आणले गेले आहे, त्यांना संरक्षित करण्याचे काम पूर्ण झाल्यावर कलाकृती संग्रहालयाच्या संग्रहात सामील करण्यात येतील.

रोमानियात यापूर्वीही शोध

रोमानिया एक समृद्ध ऐतिहासिक देश आहे. येथे अलिकडच्या महिन्यांमध्ये अनेक खजिन्यांचा शोध लागला आहे. अलिकडेच एका मेटल डिटेक्टरिस्टला रोमानियाच्या एका छोट्या गावातील शेतात 1469 रोमन नाण्यांचा भांडार मिळाला होता. तर काही महिन्यांमध्ये ट्रान्सिल्वेनियामध्ये दोन मेटल डिटेक्टरिस्टना एक हजार वर्षापूर्वीचा खजिन हाती लागला होता.

Advertisement
Tags :

.