For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समुद्रात मिळाला खजिना

06:27 AM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
समुद्रात मिळाला खजिना
Advertisement

300 वर्षांपूर्वी बुडाले हेते सोने-चांदीच्या नाण्यांनी भरलेले जहाज

Advertisement

फ्लोरिडच्या समुद्र किनाऱ्याच्या एका हिस्स्याला ‘खजिना तट’ या नावाने ओळखले जाते. येथे समुद्रात अनेक जहाजांचे अवशेष मिळाले आहेत, ज्यात खजिना लपला होता, पुन्हा एकदा समुद्रात लपलेल्या या जहाजाच्या अवशेषांमध्ये खजिना मिळाला आहे.

Advertisement

समुद्रात बुडालेल्या जहाजांच्या अवशेषांचा शोध घेणाऱ्या कंपनीच्या पाणबुड्यांनी एक मोठा खजिना शोधला आहे. 1715 मध्ये अमेरिकन वसाहतींमधून मूल्यवान सामग्री नेणारी स्पॅनिश ताफ्यातील जहाजं एका वादळात नष्ट झाली होती. त्या काळापासून स्पॅनिश जहाजांच्या अवशेषांमध्ये खजिना लपलेला होता. याचे मूल्य 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. 1715-फ्लीट-क्वीन्स ज्वेल्स एलएलसीने फ्लोरिडाच्या अटलांटिक किनाऱ्यानजीक 1000 हून अधिक चांदी आणि सोन्याची नाणी मिळाल्याची घोषणा केली आहे.  1715 फ्लीट सोसायटीनुसार शतकांपूर्वी हा खजिना स्पेनमध्ये नेण्यात येत होता, तेव्हा 31 जुलै 1715 रोजी एका वादळाने ताफ्यातील जहाजांना नष्ट केले होते, यामुळे हा खजिना समुद्रात बुडाला होता. हस्तगत करण्यात आलेल्या काही नाण्यांवरील तारीख आणि टंकसाळचे चिन्ह अद्याप दिसून येत आहे.

हा शोध केवळ खजिन्याविषयी नसून याच्याशी निगडित कहाण्यांविषयी देखील आहे. प्रत्येक नाणे इतिहासाचा एक अंश आहे. स्पॅनिश साम्राज्याच्या सुवर्णकाळात राहणे, काम करणे आणि नौकानयक करणाऱ्या लोकांसोबत याचा एक ठोस संबंध आहे. एकाचवेळी 1000 नाणी मिळणे दुर्लभ आणि असाधारण असल्याचे कंपनीचे संचालक सॅल गुट्टूसो यांनी सांगितले.

फ्लोरिडा कायद्याच्या अंगर्तत राज्याच्या मालकीची भूमी किंवा जलक्षेत्रात शोधण्यात आलेला कुठलाही खजिना किंवा अन्य ऐतिहासिक कलाकृतींची मालकी राज्याकडे असते. परंतु शोधकर्त्यांना याचा शोध घेण्याची अनुमती दिली जाऊ शकते. कायद्यानुसार हस्तगत पुरातत्व सामग्रींचा जवळपास 20 टक्के राज्याकडून संशोधन संग्रह किंवा सार्वजनि प्रदर्शनासाठी ठेवला जाणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.