कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वाळवंटात आढळणारा खजिना

06:30 AM Jul 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शोधणारा ठरतो करोडपती, दोन महिन्यात बदलतो नशीब

Advertisement

सौदी अरेबियाच्या वाळवंटी भागात दरवर्षी एक चमत्कार होतो, फग आ मशरुम या वाळवंटी भागात उगवते. याला शास्त्राrय भाषेत टरफेजिया म्हटले जाते. हा वाळवंटी मशरुम केवळ स्वादात बेजोड नसून याची किंमत इतकी अधिक आहे की, याला शोधणारा एका रात्रीत करोडपती होतो. जानेवारीच्या अखेरपासून मार्चच्या प्रारंभापर्यंत या मशरुम सीजनमध्ये सौदी अरेबियाचे बाजार ताज्या फग आने बहरून जातात. सौदी अरेबियातील हा मशरुम बटाट्यासारखा दिसतो आणि तो वाळूखाली दडलेला असतो आणि याला शोधणे कुठल्याही खजिन्याला शोधण्यापेक्षा कमी नसते. फग आ ची किंमत 500-200 सौदी रियाल (जवळपास 11 हजार ते 44 हजार रुपये) प्रतिकिलोपर्यंत असते. काही दुर्लभ प्रकारचे मशरुम आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये प्रतिकिलोपर्यंत विकले जातात.  फग आ मशरुमचे वैशिष्ट्या म्हणजे हे केवळ रकरुक किंवा सनरोज रोपानजीकच उगवते. सौदीच्या उत्तर भागांमध्येच म्हणजेच अरार आणि हफ्र अल-बातिनमध्ये हे मोठ्या प्रमाणात आढळून येते. मशरुम सीझन 25 जानेवारीपासून सुरू होत 10 मार्चपर्यंत चालतो. यादरम्यान मोठ्या प्रमाणात पाऊस आणि आर्द्रतेमुळे वाळूत हे मशरुम उगवते. वीज कडाडणे आणि पावसामुळे याचे पिक वाढत असल्याचे स्थानिक लोक मानतात. परंतु वैज्ञानिक याला आर्द्रता आणि मातीच्या स्थितीशी जोडतात. हा मशरुम सौदीसोबत इराक, सीरिया, अल्जीरिया, लीबिया आणि मॉरिटानियाच्या वाळवंटात देखील मिळतो.

Advertisement

स्वादात बेजोड

फग आ केवळ स्वादात अनोखा नसून याचे आरोग्य लाभदेखील कमालीचे आहेत. हा मशरुम डोळ्यांच्या विकारावर उपयुक्त आहे. याच्या रोपांमधून मिळणारे प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. जे याला शाकाहारी आणि वीगन लोकांदरम्यान पसंतीचे स्वरुप देते. सौदीचे पारंपरिक व्यंजन म्हणजेच कब्सा आणि सूपमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. परंतु याची दुर्लभता आणि अवघड शोध यामुळे हा मशरुम महाग ठरतो.

2018 मध्ये अल-जौफच्या एका इसमाने 50 किलो फग आ जमवत लाखो रुपये कमाविले होते, यानंतर या मशरुमला कोट्याधीश करणारे पीक ठरविले जाऊ लागले. सौदीचे लोक याला खजिन्याप्रमाणे शोधतात आणि बाजारात याची मागणी नेहमीच असते. परंतु याच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अवैध संग्रहाची समस्याही उभी ठाकली आहे. सौदी सरकारच्या व्हिजन 2030 अंतर्गत फग आ यासारख्या नैसर्गिक संपदेला पर्यटन आणि अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. काही लोक याला वाळवंटी पर्यटनाचा हिस्सा करू इच्छितात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article