ट्रेव्हिस हेडचे तुफानी अर्धशतक, कांगारुंचा इंग्लंडला दणका
पहिल्या टी-20 सामन्यात यजमान 28 धावांनी पराभूत : हेडची 23 चेंडूत 59 धावांची खेळी, सीन अॅबॉटचे 3 बळी
वृत्तसंस्था/साऊदम्प्टन (इंग्लंड)
बुधवारी रात्री उशिरा झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर इंग्लंडचा धुव्वा उडवला. द रोझ बाउल, साउथॅम्प्टन येथे खेळवल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 28 धावांनी विजय मिळवला. प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद झाला. पण गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर कांगारुंनी दमदार विजय मिळवला. 23 चेंडूत 59 धावांची खेळी करणाऱ्या ट्रेव्हिस हेडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. उभय संघातील दुसरा सामना दि. 13 रोजी कार्डिफ येथे खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंडला 151 धावांवर गुंडाळले
180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा संघ सपशेल फ्लॉप ठरला. इंग्लिश संघ 19.2 षटकात 151 धावांवर ढेपाळला. लियाम लिव्हिंगस्टनने सर्वाधिक 27 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. याशिवाय संघाचे जवळपास सर्वच फलंदाज फ्लॉप दिसले. एकूण पाच फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. यामुळे यजमान संघाला पहिल्याच सामन्यात 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 19.3 षटकांत सर्वबाद 179 (ट्रेव्हिस हेड 59, शॉर्ट 41, इंग्लिस 37, ग्रीन 13, लिव्हिंगस्टोन 3 बळी तर जोफ्रा आर्चर व मेहमुद प्रत्येकी दोन बळी). इंग्लंड 19.2 षटकांत सर्वबाद 151 (लिव्हिंगस्टोन 37, सॅम करन 18, फिल सॉल्ट 20, सीन अॅबॉट 3 बळी, हॅजलवूड व झाम्पा प्रत्येकी दोन बळी).