For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रेव्हिस हेडचे तुफानी अर्धशतक, कांगारुंचा इंग्लंडला दणका

06:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
ट्रेव्हिस हेडचे तुफानी अर्धशतक  कांगारुंचा इंग्लंडला दणका
Advertisement

पहिल्या टी-20 सामन्यात यजमान 28 धावांनी पराभूत : हेडची 23 चेंडूत 59 धावांची खेळी, सीन अॅबॉटचे 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था/साऊदम्प्टन (इंग्लंड)

बुधवारी रात्री उशिरा झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर इंग्लंडचा धुव्वा उडवला. द रोझ बाउल, साउथॅम्प्टन येथे खेळवल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 28 धावांनी विजय मिळवला. प्रथम खेळताना ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद झाला. पण गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर कांगारुंनी दमदार विजय मिळवला. 23 चेंडूत 59 धावांची खेळी करणाऱ्या ट्रेव्हिस हेडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. उभय संघातील दुसरा सामना दि. 13 रोजी कार्डिफ येथे खेळवण्यात येणार आहे.

Advertisement

प्रारंभी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी प्रथम करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 19.3 षटकांत सर्वबाद 179 धावांवर आटोपला. ट्रेव्हिस हेडने पुन्हा एकदा धमाकेदार खेळी साकारत उपस्थित प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले. सलामीवीर मॅथ्यू शॉर्टसह त्याने पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. हेडने 23 चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 59 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे हेडने पहिल्या 12 चेंडूत केवळ 16 धावा केल्या होत्या. यानंतर पुढच्या 7 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. शॉर्टने 26 चेंडूंत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 41 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर कर्णधार मिचेल मार्श स्वस्तात बाद झाला. तर जोस इंग्लिसने 27 चेंडूत 37 धावा केल्या, इतर ऑसी फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले.

इंग्लंडला 151 धावांवर गुंडाळले

180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा संघ सपशेल फ्लॉप ठरला. इंग्लिश संघ 19.2 षटकात 151 धावांवर ढेपाळला. लियाम लिव्हिंगस्टनने सर्वाधिक 27 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. याशिवाय संघाचे जवळपास सर्वच फलंदाज फ्लॉप दिसले. एकूण पाच फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. यामुळे यजमान संघाला पहिल्याच सामन्यात 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 19.3 षटकांत सर्वबाद 179 (ट्रेव्हिस हेड 59, शॉर्ट 41, इंग्लिस 37, ग्रीन 13, लिव्हिंगस्टोन 3 बळी तर जोफ्रा आर्चर व मेहमुद प्रत्येकी दोन बळी). इंग्लंड 19.2 षटकांत सर्वबाद 151 (लिव्हिंगस्टोन 37, सॅम करन 18, फिल सॉल्ट 20, सीन अॅबॉट 3 बळी, हॅजलवूड व झाम्पा प्रत्येकी दोन बळी).

Advertisement
Tags :

.