हरियाणामध्ये ट्रॅव्हल्सची ट्रॉलीला धडक : 7 ठार
06:25 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
अंबाला :
Advertisement
हरियाणातील अंबाला येथे गु रुवारी मध्यरात्रीनंतर दोन वाजण्याच्या सुमारास रस्ता अपघातात एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर सुमारे 19 जण गंभीर जखमी झाले आहेत. हे लोक उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचे रहिवासी आहेत. जम्मूतील माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात असतान त्यांच्या वाहनाला अपघात झाला. अंबाला येथील मोहरा येथे महामार्गावर त्यांचे वाहन एका ट्रॉलीला धडकले. या दुर्घटनाग्रस्तांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले.
Advertisement
Advertisement