परिवहन बँकेचा निरीक्षक लाच घेताना जाळ्यात
कोल्हापूर :
राज्य परिवहन को-ऑप. बँकेचा निरीक्षक राहुल रमेश पुजारी (वय ४३) एक लाख ५० हजारांची लाच येताना शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक बिभागाच्या जाळ्यात सापडला. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक बिभाग, पुणेच्या पथकाने कोल्हापुरात कारवाई केली. रुईकर कॉलनी येथील बैंक ऑफ बडोदाच्या समोरील रस्त्यावर सापळा रचत लाच स्वीकारताना पुजारी पास रंगेहाथ पकडले. पुजारी पाट्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.
बिभागाकडून मिळालेली माहिती अशी तक्रारदार हे जुलै २०२२ ते जून २०२३ या दरम्यान पंढरपूर शाखेत लिपीक पदावर कार्यरत असताना १८५ दिवस त्यांनी लॉग-इन केले नाही. तरीही मस्टरवर हजर असल्याचे दाखवून त्या दिवसांचा पगार घेतला. बँकेतून घेतलेल्या कर्जाचे ७ महिन्यांचे हप्ते भरले नाहीत. त्यांनी बँकेची फसवणूक केली असे आरोप ठेवून बँकेने त्यांना सेवेतून निलंबित करून बिभागीय चौकशी लावली.
चौकशीसाठी बँकेच्या कोल्हापूर शाखेतील बँक राहुल पुजारी पांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. चौकशीमध्ये तक्रारदार यांना मदत करण्यासाठी गलबकर चौकशी अहवाल पाठविण्यासाठी पुजारी तक्रारदारांकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ही रक्कम एक लाख ६० हजार करण्यात आली. पडताळणीपूर्वी पुजारी पाने तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारल्यानंतरच चौकशी अहवाल मरिष्ठ कार्यालयात पाठवून दिला. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रारदार पांचे निलंबन रद्द करत सेवेत हजर हजर करून घेतले. बँकेच्या मुंबई सेंट्रल कार्यालयात त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर पुजारी पाने तक्रारदारांना उर्वरित १ लाख १० १० हजार रुपये देण्यासाठी तगादा लावला होता. पाची तक्रार त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे केली. तक्रारीनुसार पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कोल्हापुरात सापळा रचत रुईकर कॉलनी परिसरात लाथ स्वीकारताना पुजारी पास रंगेहाव पकडले.
ही कारभाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेथे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली. पोलीस निरीक्षक विजय पवार तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.