For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तब्बल 24 आठवड्यांनी ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती

10:56 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
तब्बल 24 आठवड्यांनी ट्रान्स्फॉर्मरची दुरुस्ती
Advertisement

हेस्कॉमचा अनागोंदी कारभार : शेतकऱ्यांना फटका

Advertisement

बेळगाव : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ या उक्तीची बेळगावच्या नागरिकांना वेळोवेळी आठवण होते. ट्रान्स्फॉर्मरमध्ये बिघाड झाल्यानंतर 24 तासाच्या आत दुरुस्ती करण्याचे आश्वासन देणाऱ्या हेस्कॉमने तब्बल 24 आठवड्यांनी ट्रान्स्फॉर्मर दुरुस्त केल्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच त्याचबरोबर हेस्कॉमच्या अनागोंदी कारभाराचा फटकाही बसला. वडगाव-यरमाळ रस्त्यावरील शहापूर शिवारात ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला होता. गतवर्षी जून महिन्यात अतिवृष्टीने विद्युत खांबासहित ट्रान्स्फॉर्मर जमीनदोस्त झाला. संबंधित शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला कळवून पुरवठा बंद केला. पावसाळा संपल्यानंतर शेतकऱ्यांनी विद्युत खांब काढण्याची मागणी केली. तसेच हा ट्रान्स्फॉर्मर यरमाळ रस्त्याजवळ बसविण्याची सूचना केली. शेतकऱ्यांच्या सूचनेनुसार यरमाळ रोडवर विद्युत खांब तर उभे राहिले परंतु  ट्रान्स्फॉर्मर नव्हता.

शहापूर शिवारातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाजीपाला, काकडी, टरबूज, ऊस यासह इतर पिके घेतात. परंतु ट्रान्स्फॉर्मर नसल्याने विजेची अडचण निर्माण झाली. हेस्कॉमकडे अनेकवेळा मागणी करूनदेखील ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला नाही. शेतकरी संघटनेने हेस्कॉम अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारल्यानंतर ट्रान्स्फॉर्मर बसविला. परंतु त्याला कनेक्शन देण्यात आले नाही. शेतकऱ्यांना 24 तासांत वीजपुरवठा दिला जाईल असे सरकारकडून वेळोवेळी जाहीर केले जाते. परंतु 24 आठवडे उलटले तरी विजेचे कनेक्शन देण्यात आले नसल्याचे उदाहरण बेळगाव शहरालगत घडले आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाचा अनुभव पुन्हा एकदा शेतकऱ्यांना येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.