महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पन्नास वर्षानंतर वीज पुरवठ्यात परिवर्तन

11:50 AM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे उद्गार : मडकईत भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाला प्रारंभ

Advertisement

मडकई : वीज खात्यातर्फे ऊ. 2850 कोटी खर्चून राज्यभरात भूमिगत वीज वाहिन्या टाकून जनतेला सुरळीत वीज प्रवाह देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या कार्यकाळातील वीज वाहिन्या जीर्ण झाल्याने त्यात नवीन परिवर्तन सुऊ आहे. पन्नास वर्षानंतर हे काम हाती घेण्यात आले आहे. सुरळीत व अखंडीत वीज प्रवाहासाठीच वीज क्षेत्रातली ही क्रांती असल्याचे उद्गार वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले. पारंपई मडकई येथील श्री नवदुर्गा देवीच्या प्रकट स्थानाजवळ भूमिगत वीज वाहिन्या योजनेच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर मंत्री ढवळीकर बोलत होते. यावेळी वेलिंग प्रियोळचे जिल्हा पंचायत सदस्य दामोदर नाईक, गणपत नाईक, मडकईचे सरपंच शैलेश पणजीकर, पंचसदस्य विशांत नाईक, समाजसेवक मिथील ढवळीकर, बांदोडा पंचायतीच्या उपसरपंच चित्रा फडते, पंचसदस्य रामचंद्र नाईक, माजी सरपंच भोलू नाईक, पांडुरंग नाईक, सदानंद फडते, आनंद नाईक, वीज खात्याचे कार्यकारी अभियंते सुदन कुकंळयेकर, सहाय्यक अभियंते अरविंद ढवळीकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Advertisement

भूमिगत वीज वाहिन्या कार्यान्वित झाल्यानंतर पुढील पन्नास वर्षे वीज पुरवठ्यासंबंधी कुठल्याच समस्या जाणवणार नाहीत. मडकई मतदार संघात चाललेली भूमिगत वाहिन्यांची कामे पूर्णत्त्वाकडे आली आहेत. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून खोदकाम केलेल्या सर्व रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण होणार आहे. आतापर्यंत मडकईतील जनतेने खूप चांगले सहकार्य केले. यापुढेही विकासकामांना असेच सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री ढवळीकर यांनी पुढे बोलताना केले. शैलेंद्र पणजीकर म्हणाले, मंत्री ढवळीकरांनी मडकईत सुरु केलेल्या विकासाला तोड नाही. जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी, मडकई इस्पितळाचा दर्जा सुधारण्यासाठी त्यांनी योग्य पावले उचलली आहेत. तसेच क्रीडा क्षेत्रातही उत्तम योगदान देताना मडकईच्या मैदानाचा विकास केला आहे. विविध सुविधांनीयुक्त असलेल्या हे मैदान लोकापर्ण करण्याचा त्यांचा इरादा आहे. सुदन कुंकळकर म्हणाले, गेल्या सदतीस वर्षाच्या कार्यकाळात वीज क्षेत्रात अशी क्रांती कुठल्याच मंत्र्याने केली नव्हती. आपल्या कार्यक्षेत्रात फोंडा तालुक्यात ऊ. 300 कोटीची विकसकामे सुरु आहेत. विकासकामे करताना नागरिकांना काही अडचणी आल्यास वीज खात्याकडे संपर्क साधा. निश्चीतच सहकार्य केले जाईल, अशी हमी त्यांनी दिली. दामोदर नाईक यांनी मंत्री ढवळीकर यांच्या कार्याची स्तुती केली. मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याहस्ते देवी नवदुर्गेला श्रीफळ अर्पण करण्यात आले. तसेच उपस्थीत ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा मिरींगकर यांनी तर अरविंद ढवळीकर यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article