Solapur : कनिष्ठ अभियंता, लिपिकांच्या बदल्या..!
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबतचे काढले आदेश
सोलापूर : कामकाजाच्या प्रशासकीय सोयीकरिता महापालिकेतील सहा कनिष्ठ अभियंता, तीन भूमापक, दोन वरिष्ठ श्रेणी लिपिक आणि सात कनिष्ठ श्रेणी लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी विविध विभागांमध्ये कनिष्ठ अभियंता आणि कनिष्ठ श्रेणी लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सहा कनिष्ठ अभियंत्यांसह भूमापक, कनिष्ठ अभियंता सहायक यांचा समावेश आहे. त्यात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील अभियंता लायका मनगोळी यांची विभागीय कार्यालय क्रमांक आठ, विभागीय कार्यालय क्रमांक एककडील दीपाली चव्हाण यांची विभागीय कार्यालय क्रमांक पाच, सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील अभिजित बिराजदार यांची घनकचरा व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील चेतन परचंडे यांची घनकचरा व्यवस्थापन विभाग,
घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुचेता आमणगी यांची विभागीय कार्यालय क्रमांक एक, विभागीय कार्यालय क्रमांक दोनमधील अंजना कोने यांची विभागीय कार्यालय क्रमांक तीन, नगर अभियंता कार्यालयाकडील भूमापक लैला नदाफ यांची विभागीय कार्यालय क्रमांक दोन, विभागीय कार्यालय क्रमांक सहामधील भूमापक योगीराज याटकर यांची नगर अभियंता विभाग, तर विभागीय कार्यालय क्रमांक तीनकडील कनिष्ठ अभियंता सहाय्यक हर्षाली जाधव यांची विभागीय कार्यालय क्रमांक दोनकडे बदली करण्यात आले आहे.
दोन वरिष्ठ श्रेणी लिपिकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये क्रीडा विभागाकडील चतुरसेन पाटील यांच्याकडे निवडणूक कार्यालयाकडील अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयातील हेमंत रासणे यांच्याकडे निवडणूक कार्यालयाकडील अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे.
तर कनिष्ठ श्रेणी लिपिकांमध्ये सात जणांचा समावेश आहे. त्यात सामान्य प्रशासन विभागातील रुकसाना शेख यांची अंतर्गत लेखापरीक्षक कार्यालयात, सामान्य प्रशासन विभागातील विजयालक्ष्मी करजगी यांची आरोग्य विभाग, नगर अभियंता विभागातील अश्विनी खडतरे यांची विभागीय क्रमांक आठ, सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील बाळकृष्ण कदम यांची नगर अभियंता विभागात, आरोग्य विभागातील सुरेश पोटे यांची नगर अभियंता विभाग, मुख्य लेखापाल विभागातील नगमातरन्नुम सय्यद यांची आरोग्य विभागात तर अंतर्गत लेखापरीक्षक विभागाकडील अशोक बिराजदार यांची अंतिक्रमण विभागाकडे बदली झाली आहे.