For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची बदली

06:02 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची बदली
Advertisement

बेळगाव शैक्षणिक जिल्हा वाऱ्यावर, कोणाची लागणार वर्णी?

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगावचे जिल्हा शिक्षणाधिकारी पद पुन्हा एकदा रिक्त होणार आहे. बेळगावचे प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांना बढती देण्यात आली आहे. त्यांची कलबुर्गी जिल्ह्याच्या शाळा परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या सहसंचालकपदी (जेडी) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बेळगावचे शिक्षणाधिकारी पद रिक्त झाले आहे.

Advertisement

ऑक्टोबर 2023 मध्ये तत्कालिन जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड यांच्यावर लोकायुक्तांनी कारवाई केली. तेव्हापासून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याला कायमस्वरुपी शिक्षणाधिकारी उपलब्ध झालेला नाही. मागील आठ महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवरच शिक्षण विभागाचा गाडा हाकला जात आहे. चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांच्याकडे नोव्हेंबर 2023 अखेरीस बेळगाव जिल्ह्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली.

मागील सहा महिन्यांपासून मोहनकुमार हंचाटे चिकोडीसह बेळगाव जिल्ह्याचा कारभारही पहात आहेत. दहावीचा निकाल कमी लागल्यामुळे शिक्षण विभागावर टीकेची झोड उठवली जात होती. शिक्षणाधिकारी पद रिक्त असल्याने त्याचा परिणाम शिक्षणावर होत असल्याची नाराजी शिक्षकांनी व्यक्त केली होती. आता त्यातच हंचाटे यांना बढती देण्यात आल्याने नवीन शिक्षणाधिकारी कोण? याबाबत चर्चा होत आहे.

Advertisement
Tags :

.