महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पोलिओ लसीकरणासंदर्भात वैद्याधिकाऱ्यांना प्रशिक्षण

10:39 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : पोलिओ लसीकरण मोहीम पुन्हा एकदा राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्याधिकाऱ्यांना येथील सुवर्ण विधानसौध येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. पोलिओ, रोटाशील लस एईएफआयबाबत आरोग्याधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करून जिल्ह्यातील वैद्याधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरण उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक गुणात्मक बदल झाले आहेत. यशस्वीपणे ही मोहीम राबविल्यानंतर देशामध्ये 2011 पासून आतापर्यंत पोलिओ झाल्याचे आढळून आलेले नाही. मात्र, शेजारील पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये पोलिओ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून पल्स पोलिओ कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले. जागतिक आरोग्य संस्थेचे बेळगाव विभागातील सर्वेक्षण वैद्याधिकारी डॉ. सिद्धलिंगय्या म्हणाले, 1998 पासून बेळगाव जिल्ह्यामध्ये पोलिओचे रुग्ण आढळून आले नाहीत. दि. 3 मार्च रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याकरिता भटकी जमात, कृषी कामगार, बांधकाम कामगार, दगडाच्या खाणी आदी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या मुलांना न चुकता लस द्यावी, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article