For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लघुउद्योग भारतीतर्फे महिलांना प्रशिक्षण

06:30 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
लघुउद्योग भारतीतर्फे महिलांना प्रशिक्षण
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

लघु उद्योग भारती महिला विभाग बेळगाव व प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सुती कापडी पिशव्या बनविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. आचार्य गल्ली, शहापूर येथे झालेल्या दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिराला 50 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता.

प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गोपाळकृष्ण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी कचरा व प्लास्टिकचा पर्यावरणावर होणारा परिणाम या विषयी माहिती देत कचऱ्यापासून वस्तुनिर्मितीसाठी प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले. राज्य सचिव डॉ. प्रिया पुराणिक यांनी स्वागत करत लघु उद्योग भारतीच्या कार्यक्रमाची माहिती दिली.

Advertisement

कर्नाटक प्रदेश अध्यक्ष डॉ. सचिन सबनीस यांनीही मार्गदर्शन केले. नलिनी विमोलकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दीपा, शशी, रूपा, वीणा, अश्विनी यांनीही मते मांडली.

Advertisement
Tags :

.