महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रथमोपचार तज्ञांना प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्रे द्या

10:26 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : राज्यात मागील तीस ते चाळीस वर्षांपासून ग्रामीण भागासह झोपडपट्टी भागात प्रथमोपचार तज्ञांकडून सेवा दिली जाते. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण अथवा प्रमाणपत्र दिले जात नसल्याने अधिकाऱ्यांकडून त्रास देण्याचा प्रयत्न होतो. यामुळे कुटुंब कसे चालवायचे? हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. राज्य सरकारने या सर्व प्रथमोपचार तज्ञांना प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देण्याची मागणी कर्नाटक स्टेट फर्स्ट एड् एक्स्पर्ट असोसिएशनतर्फे राज्य सरकारकडे करण्यात आली. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पोहोचल्या नसल्याने त्याठिकाणी प्रथमोपचार तज्ञ सेवा देत असतात. परंतु काही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या तज्ञांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रमाणपत्र नसताना सेवा कशी देता? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.त्यामुळे राज्य सरकारने आंध्रप्रदेशच्या धर्तीवर प्रशिक्षण देऊन या सर्व कर्मचाऱ्यांना मान्यता द्यावी, अशी मागणी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article