महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इंडोनेशियाच्या जावामध्ये रेल्वे दुर्घटना

06:28 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रुळावरून घसरले डबे, तीन जणांचा मृत्यू

Advertisement

वृत्तसंस्था/ जकार्ता

Advertisement

इंडोनेशियातील मुख्य बेट जावा येथे शुक्रवारी दोन रेल्वेगाड्या परस्परांना धडकल्या आहेत. या दुर्घटनेनंतर रेल्वेगाड्यांचे डबे उलटल्याने तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही दुर्घटना पश्चिम जावाच्या बांडुंग शहरातील  सिकलेंग्का रेल्वेस्थानकापासून सुमारे 500 मीटर अंतरावर घडली आहे. पूर्व जावा प्रांताची राजधानी सुरबाया येथून बांडुंगच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेने सिसलेंग्का स्थानकातून पदालांरंगच्या दिशेने जात असलेल्या रेल्वेला धडक दिल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यात रेल्वेगाड्यांचे अनेक डबे उलटल्याचे आणि मेठे नुकसान झाल्याचे दिसून येते. या दुर्घटनेमागील कारणांचा आता तपास केला जात आहे. इंडोनेशियात अन्य जुने रेल्वेनेटवर्क असल्याने तेथे  रेल्वे दुर्घटनांचे प्रमाण तुलनेत अधिक आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article