For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘विक्की और विद्या का वो वाला वीडियो’चा ट्रेलर

06:01 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘विक्की और विद्या का वो वाला वीडियो’चा ट्रेलर
Advertisement

राजकुमार राव आणि तृप्ति डिमरी यांची मुख्य भूमिका असलेला ‘विक्की और विद्या का वो वाला वीडियो’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कॉमेडी-ड्रामा चित्रपटाला 90 च्या दशकातील पार्श्वभूमीवर उत्तमप्रकारे दर्शविण्यात आले आहे.  चित्रपटात राजकुमार हा विक्की तर तृप्ति ही विद्याच्या भूमिकेत आहे. त्यांनी स्वत:चा एक व्हिडिओ रिकॉर्ड केलेला असतो, जो त्यांच्याच घरातून चोरीला जातो. हा व्हिडिओ शोधून देण्याचे काम करणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका विजय राज यांनी साकारली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मल्लिका शेरावतची झलकही दिसून येते. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. चित्रपटात विजय राज, मल्लिका शेरावत, मस्त अली, अर्चना पूरन सिंह, मुकेश तिवारी, अर्चना पटेल, राकेश बेदी, टीकू तल्सानिया आणि अश्विनी काळसेकर हे कलाकारही दिसून येणा आहेत.

Advertisement

भूषण कुमार, कृष्ण कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर, विपुल शाह, अश्विनी वर्दे आणि राजेश बहल यांच्याकडून निर्मित हा चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.