‘निकिता रॉय’चा ट्रेलर प्रदर्शित
सोनाक्षी सिन्हाचा सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट
सोनाक्षी सिन्हाची मुख्य भूमिका असलेला चित्रपट निकिता रॉयचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सोनाक्षीचा भाऊ कुश सिन्हाकडून दिग्दर्शित हा चित्रपट एक इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टोरी दर्शविणारा असून यात काही तणावपूर्ण हॉरर एलिमेंट्सचे मिश्रण आहे.
सोनाक्षीने चित्रपटात एका इन्व्हेस्टिगेटरची भूमिका साकारली आहे. अमर देव (परेश रावल) नावाच्या एका शक्तिशाली आणि रहस्मय स्प्रिच्युअल हीलरच्या गुन्ह्यांना जगासमोर आणण्यासाठी ती धडपडत असते. अर्जुन रामपाल यात पॅरानॉमल रिसर्चरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सोनाक्षी ही सुमारे तीन वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. सोनाक्षीसोबत या चित्रपटात परेश रावल, सुहैल नय्यर आणि अर्जुन रामपाल यासारखे कलाकार आहेत. हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कहाणी पवन कृपलानी यांनी लिहिली आहे.
सोनाक्षी यापूर्वी ‘काकुडा’ या चित्रपटात दिसून आली होती. तिचा हा चित्रपट 12 जुलै 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे समीक्षकांकडून कौतुक करण्यात आले होते.