For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘खो गए हम कहां’चा ट्रेलर प्रदर्शित

08:55 PM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
‘खो गए हम कहां’चा ट्रेलर प्रदर्शित
Advertisement

अनन्या पांडे मुख्य भूमिकेत

Advertisement

आदर्श गौरव, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा चित्रपट ‘खो गए हम कहां’चा ट्रेलर अखेरीस प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट तीन सर्वात चांगल्या मित्रांचे आयुष्य दर्शविणारा आहे. अर्जुन वरैन सिंह यांचे दिग्दर्शन लाभलेला हा चित्रपट तीन मित्रांच्या कहाणीवर आधारित आहे. चित्रपटात तीन मित्र डिजिटल जगतात हरवून गेल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.

या चित्रपटात रोमान्ससोबत इमोशनल ड्रामा देखील दिसून येईल. या चित्रपटात आदर्श, अनन्या, सिद्धांतसोबत कल्कि कोचलिन, आन्या सिंह, रोहन गुरबक्सानी, विजय मौर्य, दिव्या जगदाळे, राहुल वोहरा आणि सुचित्रा पिल्लई देखील मुख्य भूमिकेत आहे.

Advertisement

ट्रेलरमध्ये अनन्या पांडे एक फोटो क्लिक करताना दिसून येते, यानंतर बॅकग्राउंड साउंडद्वारे ‘हब सब सिर्फ और सिर्फ सोशल मीडिया पर शो ऑफ करते हैं’ असा आवाज ऐकू येतो. हा चित्रपट 26 डिसेंबर रोजी  नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. एक्सेल एंटरटेन्मेंटचे रितेश सिधवानी, फरहान अख्तर, टायगर बेबीच्या रिमा कागती आणि जोया अख्तरकडून या चित्रपटाची निर्मिती करविण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.